Kolhapur News : आजऱ्यात खेळताना गळफास लागून विद्यार्थिनीचा मृत्यू

आजरा पोलिसांत घटनेची नोंद
Accident News
आजऱ्यात खेळताना गळफास लागून विद्यार्थिनीचा मृत्यू
Published on
Updated on

आजरा : घरात खेळत असताना ओढणीचा फास गळ्यात अडकल्याने सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळफास लागून मृत्यू झाला. आफिया जाबीर शेख (वय १३) असे तिचेे नाव आहे. आजरा पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

शेख हे नाईक गल्लीत भाड्याने राहतात. सोमवारी रात्री आफिया घरातच खेळत होती. घरातील लाकडी तुळईच्या हुकाला ओढणी बांधून ती झोका घेत होती. खेळताना अचानक ओढणीचा फास गळ्यात अडकला व त्यातच तीचा फास लागून मृत्यू झाला. मुले खेळतात म्हणून दोनच दिवसांपूर्वी वडील जाबीर यांनी ती ओढणी काढून टाकली होती. आफियाने वडील घरात नाही म्हणून खेळण्यासाठी पुन्हा ओढणी बांधली. त्याच ओढणीमुळे आफियाचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news