Kolhapur Crime : अभ्यास करत नसल्याने आई- वडील रागावले, १३ वर्षाच्या शाळकरी मुलीने रागाच्या भरात...

तारदाळमधील धक्कादायक घटना
Kolhapur Crime News
Kolhapur Crime News
Published on
Updated on

यड्राव : अभ्यास करत नाहीस, घरातील काम करत नाहीस, असे म्हणत आई-वडील रागावल्याने शाळकरी मुलीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. संजीवनी कुलदीप करवीरे (वय 13, रा. जे.के.नगर, तारदाळ, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय विनायक कोरे यांनी शहापूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.

संजीवनी ही सातवीमध्ये शिकत होती. तिचे आई-वडील रोजगारावर कामाला जातात. संजीवनी घरातील कामे करीत नाही, अभ्यासही करीत नाही, यावरून आई-वडील व तिच्यात वाद झाला होता. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता वडील व नऊ वाजता आई कामावर गेली. संजीवनी एकटीच घरी होती. वादाचा राग मनात धरून तिने घराच्या पुढील बाजूच्या दरवाजाला कुलूप लावले. पाठीमागील बाजूने घरात जात दरवाजाला कडी लावली. सायंकाळी साडेसहापूर्वी बेडरूमच्या छताच्या हुकास साडीने गळफास घेऊन जीवन संपविले. सायंकाळी कामावरून आई घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत मृतदेह विच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठविला. संजीवनी हिने जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आई-वडिलांशी झालेल्या भांडणाचा उल्लेख असून, चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news