Gokul News : ‘समविचारी’चा उद्या कोल्‍हापुरात संघर्ष मोर्चा

शासन नियुक्‍त संचालक निर्णयाचा करणार निषेध; दसरा चौकातून होणार मोर्चाला सुरुवात
Satej Patil
Satej PatilFile Photo
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : राज्‍य सरकारकडून गोकुळमध्‍ये शासन नियुक्‍त संचालकांची नियुक्‍ती करण्‍याबाबत घेतलेल्‍या निर्णयाविरोधात समविचारी आघाडीकडून सोमवारी (दि. ९) जिल्‍हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्‍यात येणार आहे.

दसरा चौक येथून सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चामध्‍ये दूध उत्‍पादक शेतकरी, नागरिक यांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन केले आहे. राज्‍य शासनाने ‘अ’ वर्ग सहकारी संस्‍थांमध्‍ये ज्‍या संस्‍थांची वार्षिक उलाढाल पाचशे कोटींहून अधिक आहे, अशा संस्‍थांवर पाच शासन नियुक्‍त संचालकांची नेमणूक करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळ निवडणुकीत समविचारी आघाडीला १३ आणि महायुतीला १२ जागांवर यश मिळाले. पण अध्‍यक्ष निवड सभेसाठी आवश्‍यक असणारा १४ संचालकांचा कोरम पूर्ण करण्‍याची संख्‍या दोन्‍ही आघाड्यांकडे नाही. शासन नियुक्‍त संचालकांमुळे महायुतीचा अध्‍यक्ष निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्‍यामुळे हा निर्णय म्‍हणजे लोकशाहीचा खून असल्‍याचा आरोप समविचारी आघाडीकडून होत आहे. या निर्णयाच्‍या निषेधार्थ समविचारीकडून सोमवारी कोल्‍हापुरात मोर्चा काढण्‍यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.