प्रचारासाठी वासुदेव कलाकारांचा वापर करणार्‍या पालकमंत्र्यांचे हेच पुरोगामीत्व काय?

Maharashtra Assembly Election : समरजित घाटगे यांचा सवाल
Samarjit Ghatge
समरजित घाटगे
Published on: 
Updated on: 

सेनापती कापशी : छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलने संपूर्ण देशाला पुरोगामीत्वाचा विचार दिला. अशा भूमीत पालकमंत्र्यांना प्रचारासाठी वासुदेवाच्या वेशभूषेतील कलाकारांचा वापर करावा लागतो, हेच त्यांचे पुरोगामीत्व काय, असा परखड सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित केला. माद्याळ, ता. कागल येथे त्यांच्या प्रचारार्थ झालेले जाहीर सभेत बोलत होते.

घाटगे पुढे म्हणाले, पालकमंत्री गेल्या पंचवीस वर्षांत विकासकामांचा डोंगर उभारला म्हणतात. त्यांनी खरं म्हणजे विकासकामांच्या जोरावर मते मागायला पाहिजेत; मात्र त्यांना भारतीय संस्कृतीतील पारंपरिक लोककलाकार असलेल्या वासुदेव यांचा प्रचारासाठी वापर करावा लागत आहे, हे दुर्दैवी असून, त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे हे द्योतक आहे.

पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर म्हणाले, पालकमंत्र्यांकडे या निवडणुकीच्या कालावधीत काहीही मागा, सूर्य-चंद्र सोडून सर्व ते देतील. कागलच्या जनतेने त्यांना पंचवीस वर्षे सत्ता दिली आहे. याचा वापर त्यांनी मर्जीतील ठेकेदार, बगलबच्चे व स्वतःच्या विकासासाठी केला. त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश कुराडे म्हणाले, गडहिंग्लज उपविभागात जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी, प्रकाश शहापूरकर, कृष्णात पाटील, बालाजी फराकटे यांच्यासह अनेक नेत्यांनी यावेळी समरजितराजेंना पाठबळ दिले आहे. याशिवाय राजेंच्या विजयासाठी अनेक अद़ृश्य शक्तीही काम करीत आहे. त्यामुळे समरजितराजेंचा विजय निश्चित आहे. यावेळी आनंदभाई ढोणुक्षे, नामदेव ढोणुक्षे, रणजित ढोणुक्षे, राजाराम ढोणुक्षे, किरण ढोणुक्षे, भाऊ ढोणुक्षे, शिवाजी मुसळे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. शिवानंद माळी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे माजी संचालक रणजित पाटील, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सागर कोंडेकर, शिवानंद माळी, रवी घोरपडे, दिग्विजय कुराडे, दयानंद पाटील, अरुण व्हरांबळे, बंटी घोरपडे, राजू घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते. शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. रंगराव मेतके यांनी आभार मानले.

शाश्वत विकासाचे व्हिजन असलेल्या समरजितराजेंना आमदार करूया...

यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे म्हणाले, कोणतेही संविधानिक पद नसताना समरजितराजेंनी कागल-गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. याशिवाय राजे फाऊंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांच्या समरजितसिंह आपल्या दारी या उपक्रमाचे तर राज्यभर कौतुक झाले. शाश्वत विकासाचे व्हिजन असलेल्या समरजितसिंह घाटगे यांना आमदार म्हणून निवडून देऊया.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news