Tempo collision news | पीरवाडीत टेम्पोच्या धडकेत सडोलीतील महिलेचा मृत्यू

पती गंभीर जखमी; टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
Tempo collision news |
Tempo collision news | पीरवाडीत टेम्पोच्या धडकेत सडोलीतील महिलेचा मृत्यू
Published on
Updated on

वाशी : नातेवाईकांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी कोल्हापूरकडे निघालेल्या दुचाकीला पीरवाडी (ता. करवीर) येथे अज्ञात टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात योगिता दीपक दिंडे (50, रा. सडोली खालसा) यांचा मृत्यू झाला; तर त्यांचे पती दीपक दिनकर दिंडे (58) गंभीर जखमी झाल. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

दिंडे दाम्पत्य रविवारी सकाळी दुचाकीवरून कोल्हापूर येथे नातेवाईकांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी निघाले होते. पीरवाडी येथे टेम्पोने ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. परिसरातील नागरिकांनी जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. योगिता यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिंडे दाम्पत्याला दोन मुले असून एक मुलगा इंजिनिअर आहे, तर दुसरा मुलगा सहा महिन्यांपूर्वी सैन्य दलात भरती झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news