RTE admissions | ‘आरटीई’ प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा दुप्पट अर्ज

जिल्ह्यातील 315 शाळा; 3,361 जागांसाठी 5,328 अर्ज, पहिली फेरी पूर्ण
RTE admissions |
RTE admissions | ‘आरटीई’ प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा दुप्पट अर्ज
Published on
Updated on

कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ‘आरटीई’च्या 25 टक्के राखीव जागांवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील 315 शाळांमधील 3 हजार 361 जागांसाठी 5 हजार 328 अर्ज आले आहेत.

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेंतर्गत नुकतीच शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया पार पडली. यातून पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रतीक्षा यादी निश्चित करण्यात आली. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना 20 एप्रिलपर्यंत लॉटरीमध्ये मिळालेल्या शाळेत प्रवेश घेता येणार आहे. शिक्षण विभागाने पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या नावासह मोबाईलवर संदेश पाठविण्यास सुरुवात केली आहे. पालकांनी या संदेशावर अवलंबून न राहता ‘आरटीई’ पोर्टलवरील अ‍ॅप्लिकेशन वाईज डिटेल्स किंवा सिलेक्टेड वेटिंग लिस्ट या पर्यांयाद्वारे स्वतःच्या अर्ज क्रमांकावरून खात्री करावी.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘आरटीई’ पोर्टलवरून अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करून पडताळणी केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी. त्यानंतर पडताळणी समितीकडून मिळालेल्या प्रवेश निश्चितीच्या पावतीसह संबंधित शाळेत जाऊन अंतिम प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. निर्धारित कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न करणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत संधी मिळणार नाही. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी पुढील फेर्‍यांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news