कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे होणाऱ्या विसर्गातून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे नृसिंहवाडी येथे कृष्णा व पंचगंगा नदीचे पाणी शुक्रवारी (दि.6) वाढले असून परत एकदा दत्त मंदिरात शिरले आहे. मागील चार-पाच दिवसांपासून कोयना धरण पूर्ण भरले असून धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने दोन दिवसात आठ ते दहा फुटांनी वाढली आहे. पाणी पातळी वाढल्याने येथील दतमंदिरात यावर्षीचा चौथा दक्षिण द्वार सोहळा रात्री उशिरा होण्याची शक्यता वाढली आहे.
राधानगरी, चांदोली,पाटण ,कोयना आदी परिसरात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा , पंचगंगा नद्यांचा पाणी पातळीत वाढ झाल्याने संगमेश्वर मंदिर पाण्याखाली गेलेले आहे. जोरदार पाऊस नसतानाही कृष्णा नदीचे पाणी वाढण्याची क्षमता लक्षणीय आहे श्री दत्त मंदिरात वारंवार पाणी येत आहे याबाबतचे नेमके कारण समजू शकत नाही पाणी वाढल्यामुळे दत्त देवस्थान कडुन आवश्यक ती उपयोजना करण्यात येत आहे.