कोल्हापूर : विकासकामांचे निश्चित धोरण ठरवून गेल्या पाच वर्षांत दक्षिणेत कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. भविष्यात दक्षिण मतदारसंघाला अधिक समृद्ध करण्यासाठी आपले आशीर्वाद व पाठबळ द्या, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. तामगाव येथे आयोजित पदयात्रेदरम्यान ते बोलत होते.
आमदार ऋतुराज पाटील यांनी तामगाव ग्रामपंचायत चौकातून पदयात्रेला सुरुवात केली. कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि ठिकठिकाणी होणारे उत्साही स्वागत हे चित्र या पदयात्रेत होते. सरपंच सुरेखा हराळे म्हणाल्या, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. महिलांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान वाढावे तसेच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमदार ऋतुराज पाटील यांना साथ द्या.
उपसरपंच महेश जोंधळेकर म्हणाले, जनतेच्या विकासासाठी राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती महत्त्वाची असते. समाजातील प्रश्नांची जाण, जागरूकता हे महत्त्वाचे असते. या सर्व बाबी आमदार ऋतुराज पाटील यांच्यात आहे. सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचे कसब आ. ऋतुराज पाटील यांच्याकडे आहे. त्यांना तामगावातून मोठे मताधिक्य देऊन विजयी करूया. सदस्य हंबीरराव तरटे म्हणाले, एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करून तो सोडवण्याची आमदार ऋतुराज पाटील यांची कार्यपद्धती आपण गेल्या पाच वर्षांत अनुभवली आहे. सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या आ. पाटील यांनी विकासाचा आश्वासक चेहरा म्हणून जनतेच्या मनात ओळख निर्माण केली आहे. मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी त्यांना उच्चांकी मताधिक्य देऊन विजयी करूया.
यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, ग्रामपंचायत सदस्या मेघा आडनाईक, गायत्री गायकवाड, श्रीधर गवते, विठ्ठल पुजारी, माजी सैनिक तानाजी सासने, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर कांबळे, कृष्णात जोंधळेकर, राजेंद्र पावंडे, निवास जोंधळेकर, स्वप्निल माने, अमर शिंदे, संतोष पाटील, महेश पिंपळे, आनंदा जोंधळेकर, शकील मुजावर, सिद्दू गावडे, अब्बास पठाण, संभाजी आडनाईक, शाहीर बिरदेव पुजारी, तुकाराम गावडे, सागर चौगुले आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.