Hapus Mango | मुंबईचे मार्केट डाऊन झाल्याने कोल्हापुरात हापूस आवक वाढली

Hapus Mango |
Hapus Mango | मुंबईचे मार्केट डाऊन झाल्याने कोल्हापुरात हापूस आवक वाढली
Published on
Updated on

कोल्हापूर : मुंबईतील आंबा मार्केट डाऊन झाल्याने बुधवारी व गुरुवारी कोल्हापूरमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली. गुरुवारी कोल्हापूर बाजार समितीत 1900 बॉक्स आंबा दाखल झाला. आवक वाढली असली तरी 1000 ते 1200 रुपये प्रतिडझन दर आहे. आठवडाभरानंतर आवक वाढेल त्यानंतर दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, असा अंदाज व्यापार्‍यांचा आहे.

कोकणात यंदा देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे बाजारात आवक अत्यल्प आहे. कोकणातील आंबा बागायतदारांसाठी मुंबई सर्वात मोठे मार्केट आहे. मात्र युद्ध व निर्यातीसाठी लागणार्‍या संख्येत आंबा उपलब्ध होत नसल्याने निर्यातीवरही परिणाम झाला आहे. आवक कमी असल्याने आंब्याचे दर वधारले. चढ्या दरामुळे आंब्याला मागणी कमी झाल्याने सध्या मुंबईचे आंबा मार्केट डाऊन आहे. परिणामी दर कमी झाल्याने मुंबईला जाणार्‍या काही बागायतदारांची पावले कोल्हापूरसह स्थानिक बाजारांकडे वळली आहेत. त्यामुळे सध्या स्थानिक बाजारात आंब्याची आवक वाढली आहे.

आठवडाभरानंतर हापूस आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी बाजार समितीत सौद्यात क्वालिटीनुसार कमी 700 तर जास्त 1800 रुपये दर निघाला; तर सरासरी दर 1100 ते 1200 रुपये प्रति डझन असा राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news