Malviwadi Land Sale Case | मळवीवाडी जमीन विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक

डिजिटल साईन, लेटर पॅड एजंटकडे सोपवले, आणखी दोघांना अटक
Malviwadi Land Sale Case |
Malviwadi Land Sale Case | मळवीवाडी जमीन विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक File Photo
Published on
Updated on

चंदगड : मळवीवाडी (ता. चंदगड) येथील १२ एकर सरकारी जमीन बेकायदेशीरपणे विक्री प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढली असून, जिल्हाधिकारी यांची डिजिटल साईन मेलद्वारे व लेटर पॅड एजंटकडे सोपवणारा मुख्य सूत्रधार व जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक तसेच तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत असल्याने चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चार दिवसांपूर्वी या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून तातोबा गावडा ( वय ३८, रा. मुगळी, ता. चंदगड) याला सव्वा महिन्यानंतर अटक करण्यात आली. यानंतर सोमवारी (दि. २१) मुख्य सूत्रधार म्हणून तपासात पुढे आलेला कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेचा महसूल सहायक राजेंद्र विष्णू माळी (वय ३८, रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) याच्यासह महेश मल्लिकार्जुन बसापुरे (वय ३८, रा. तुर्केवाडी, ता. चंदगड ) याला लॅपटॉप मधून बनावट आदेश पत्र तयार केल्याप्रकरणी तुर्केवाडी येथून अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार राजेंद्र माळी याने जिल्हाधिकारी यांची डिजिटल साईन मेलद्वारे महेश बसापुरे याला पुरवली. बसापुरे याने या डिजिटल साईनचा वापर करून खासगी लॅपटॉपमधून बनावट आदेश तयार केला. यानंतर बनावट आदेशावर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांचा शिक्का मारून घेतला, असा संशय पोलिसांना आहे. तपासादरम्यान पाटणे फाटा चंदगड येथील महेश बसापुरे याच्या कार्यालयातून पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला आहे.

तातोबा गावडाच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

मळवीवाडी प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या तातोबा गावडा याची तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news