kolhapur | मसूद माले तलावात आढळला निवृत्त महिला अधिकाऱ्याचा मृतदेह

मृत्‍यूबाबत नागरिकांतून संशय व्यक्त
kolhapur |
kolhapur | मसूद माले तलावात आढळला निवृत्त महिला अधिकाऱ्याचा मृतदेह
Published on: 
Updated on: 

कोडोली : पन्हाळा तालुक्यातील मसूद माले येथील तलावात माया अशोक कुलकर्णी (वय ६२, मूळ गाव कोडोली, सध्या रा. माले, ता‌. पन्हाळा) यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. कुलकर्णी या नगररचना विभागात वर्ग एक अधिकारी म्हणून निवृत्त झाल्या होत्या. दरम्यान, त्यांच्‍या मृत्‍यूबाबत नागरिकांतून संशय व्यक्त होत आहे.

मसूद माले तलावाशेजारी असणाऱ्या फार्म हाऊसमध्ये माया कुलकर्णी या आपला मुलगा अमोल सोबत राहात होत्या. रात्री हे दोघेही झोपले होते. शनिवारी सकाळी आठ वाजता मुलगा अमोल उठला असता त्याला आई घरामध्ये नसल्याचे निदर्शनास आले. त्याने कोल्हापूर येथील मामा धनंजय जोशी यांना हा प्रकार मोबाईलवरून सांगितला. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, जाफळे येथील काही तरुण आंंघोळीसाठी आले असता माले तलावाच्या आऊटलेट कठड्याजवळ त्यांना महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. याची माहिती मिळताच कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून व्हिसेरा अधिक तपासाकरिता पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवला आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news