वृद्ध डॉक्टरच्या काळ्या कारनाम्यांनी कोल्हापूर हादरले; निवृत्त सिव्हिल सर्जनने केल्‍या २५० स्‍त्रीभ्रूण हत्‍या

Kolhapur Crime : सत्तर वर्षीय डॉ. चंद्रकांत गायकवाडच्या आवळल्या मुसक्या
Kolhapur Crime News
Kolhapur Crime News
Published on
Updated on

कोल्हापूर : शासकीय सेवेत सिव्‍हिल सर्जन (जिल्हा शल्यचिकित्सक) पदावर काम करून निवृत्त झालेल्या डॉक्टरनेच २५० हून अधिक बेकायदेशीर गर्भपात करत स्‍त्रीभ्रूण हत्‍या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड (वय ७०, रा. लिशा हॉटेलनजीक, कदमवाडी) असे या डॉक्टरचे नाव असून, कळंबा गर्भलिंग चाचणी प्रकरणात करवीर पोलिसांनी कदमवाडी येथील त्याच्या प्रतिमा हॉस्पिटलवर छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. गेल्या दीड वर्षात हे गर्भपात केल्याची कबुली डॉ. गायकवाड याने दिली आहे. गर्भलिंग चाचणी, अवैध गर्भपात याविरोधात जनजागृती, मोहीम राबविण्याचे, कारवाई करण्याचे काम करणाऱ्याच डॉक्टरने निवृत्तीनंतर मात्र त्याचाच धंदा मांडला. या धक्कादायक प्रकाराने कोल्हापूर हादरले आहे.

बुधवारी रात्री कदमवाडी येथील डॉ. गायकवाड याच्या रुग्णालयात छापा टाकून सोनोग्राफी मशिन, गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या. कारवाईनंतर डॉ. गायकवाडची प्रकृती खालावल्याने उपचारांसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. कळंबा येथील थ्रीस्टार लॉजिंगवरील गर्भलिंग निदानप्रकरणी करवीर पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिला एजंट मनीषा दिनकर कांबळे (वय ३७, रा. सावर्डे पाटण), अश्विनी गजानन शिंदे (३८, रा. कसबा वाळवे) यांच्याकडे चौकशी केली असता डॉ. गायकवाडचे नाव समोर आले.

२५० गर्भपात केल्याची कबुली

डॉ. गायकवाड हा १० वर्षांपूर्वी सिव्‍हिल सर्जन म्हणून सेवानिवृत्त झाला आहे. त्यानंतर त्याने कदमवाडी येथे प्रतिमा हॉस्‍पिटल सुरू केले. गेल्या ४ वर्षांपासून तो गर्भपाताचा धंदा करत असल्याची कबुलीच त्याने दिली. एका गर्भपातासाठी रुग्‍णाची आर्थिक स्थिती पाहून २० ते ४० हजारांपर्यंत रक्कम घेत होता. दीड वर्षात २५० हून अधिक महिलांचे गर्भपात केल्याची कबुलीही त्याने दिली.

अटक टाळण्यासाठी दवाखान्यात

अटकेची कारवाई होणार, या भीतीने डॉ. गायकवाडचा रक्‍तदाब १८० पर्यंत गेला, त्याची शुगरही २९५ पर्यंत वाढली. यामुळे पोलिसांनी त्याला सीपीआरमध्‍ये दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news