CPR Hospital | सीपीआरमधील निवासी डॉक्टरांची निदर्शने

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीविरोधात आंदोलन; आपत्कालीन सेवा सुरू
CPR Hospital |
कोल्हापूर : सीपीआर येथे निदर्शने करताना निवासी डॉक्टर.
Published on
Updated on

कोल्हापूर : बीएचएमएस-सीसीएमपी पात्रता प्राप्त डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) मार्फत नोंदणी देण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात सीपीआर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी आंदोलन सुरू केले. शासनाने निर्णय मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

मार्डच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीपीआरमध्ये निदर्शने करण्यात आली. आंदोलनात निवासी डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे नियमित ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आली. मात्र, आपत्कालीन व अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू होती. मार्डचे अध्यक्ष डॉ. सुशील बिरादार म्हणाले, केवळ एका वर्षाच्या सीसीएमपी प्रशिक्षणाच्या आधारे आधुनिक वैद्यकात नोंदणी देणे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली.

बीएचएमएस - सीसीएमपी धारकांची एमएमसी नोंदणी प्रक्रिया तत्काळ स्थगित करावी. मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये. पुढील धोरणात्मक निर्णयापूर्वी सेंट्रल मार्डच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. यावेळी डॉ. रोहिता घरीआराम, डॉ. प्रवीण सानप, डॉ. सानिका आणि डॉ. एकता इंगळे उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news