कोल्हापूर : खंडपीठ, सर्किट बेंचसाठी गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे. फक्त तुम्ही लीड घेतले म्हणूनच कोल्हापूरला सर्किट बेंच झाले, असे गौरवोद्गार दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार करून विविध मान्यवरांनी काढले. दरम्यान, डॉ. जाधव यांनी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे. खंडपीठाबाबतही पाठपुरावा करू. राज्य शासनातर्फे शेंडा पार्क येथे 100 कोटींतून दोन वर्षांत सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याचे सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्याबद्दल दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सोमवारी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपनेते संजय पवार यांनी सत्कार केला. यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, तालुकाप्रमुख विराज पाटील, मंजित माने, अरुण अब्दागिरी, स्मिता सावंत, पूनम फडतरे, संतोष रेडेकर, संजय जाधव, समीत मेळवंकी, सुनील कोंडेकर, अभिजित बुकशेट, संजय धुमाळ, प्रवीण पालव, अक्षय मोरे, सुधीर चिले आदी उपस्थित होते.