

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून आठ दिवसांपूर्वीच दाखल झाला. त्या नंतर मान्सूनमध्ये ही पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जून महिन्यात 234 मि.मि. इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सरासरी 3364.22 इतका वार्षिक पाऊस पडत असतो. यंदा 1 जून ते 22 जून दरम्यान 6313.21 म्हणजेच सरासरी 701.47 इतका पाऊस झाला आहे. 21 दिवसांत 20.85 टक्के इतका पावसाची बरसात झाली असून मागील वर्षी जून महिन्यात 4208.49 म्हणजेच सरासरी 467.61 इतका पाऊस झाला होता. एकंदरित मागील वर्षीपेक्षा यावेळी जून महिना कोकणासाठी लकी ठरला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खरा पाऊस हा जुलै महिन्यात धो-धो पाऊस पडत असतो. कित्येक तालुक्याला पुरांचा विळखा असतो. यंदाच्या वर्षी मे महिन्यात मान्सून दाखल झाला. मेच्या शेवटच्या आठड्यात पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले.
मागील 20 ते 30 वर्षात मे महिन्यात असा सर्वाधिक पाऊस झाला होता. यामुळे कोकणातील शेतकर्यांनी लवकरच नागरणी, पेरणीची लगबग सुरू केली. जून महिन्यात 21 दिवसांत सरासरी 701.47 मि. मी. इतका पाऊस झालेला आहे. मे आणि जून महिन्यात दरड कोसळली, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच काहींना जीव ही गमवावा लागला. एकंदरीत लाखो रुपयांचे नुकसान जिल्ह्यातील नागरिकांचे झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 234 मि.मी. इतका जास्त आहे. जुलै महिन्यात कोकणात सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कित्येक शेतकर्यांनी भात शेतीसाठी नागरणी केली असून जास्तीत जास्त भात शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे. 30 हजार हेक्टरहून अधिक पेरण्यात जिल्ह्यात झाल्या आहेत. तसेच नाचणी व इतर पिकांचे उत्पादनासाठी शेतकर्यांनी पेरण्या करण्यास सुरूवात केली आहे.