

राशिवडे: पुढारीवॄतसेवा राधानगरी तालुक्यातील राशिवडे बु,पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी आणखी मुरगुड पोलीस ठाण्यातील हद्दीमध्ये झालेल्या बकरी चोरीप्रकरणी चंदगड तालुक्यातील चार संशयितांना पन्हाळा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आज दिवसभर या संशयितांना चोरीच्या घटनेच्या ठिकाणी फिरवून चोरी बाबत माहीती घेण्यात आली. या टोळक्याकडुन अनेक बकरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे
शाहुवाडी विभागाचे डी.वाय.एस.पी.आप्पासो पवार, पन्हाळा पोलीस ठाण्याचे पो.नि.संजय बोबंळे, पी.एस.आय.महेश कोडुभैरी, सिताराम डोईफोडे यांनी संशयित म्हणून चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये जिल्ह्यात राशिवडे बु,खोतवाडी, मुरगुड याठिकाणी बकऱ्याची चोरी केल्याचे सांगितले, व व्हॅनमधून ही बकरी नेल्याचे सांगितले . यावरुन यापैकी एका संशयिताला म्हणजेच व्हॅनचालकाला घटनास्थळी आणण्यात आले. खोतवाडी येथुन २०, राशिवडे बु येथून २५ तर मुरुड हद्दीतून १५ बकरी चोरीला गेल्याची नोंद आहे. त्यामुळे या टोळक्याकडून आणखी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.