राशिवडे खुर्द येथे पुलाला धडकून शिरगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Kolhapur Accident News | राशिवडे खुर्द ते शिरगाव मार्गावरील घटना
Kolhapur Shirgaon youth death
शिरगाव येथील अभिनव गौड याचा अपघातात मृत्यू झाला. Pudhari Photo
Published on
Updated on

राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : राशिवडे खुर्द ते शिरगाव मार्गावरील ओढ्याच्या पुलाला मोटरसायकलची जोराची धडक बसली. ही घटना आज (दि.३१) पहाटेच्या दरम्यान घडली. या अपघातात अभिनव शरद गौड (वय १६) याचा मॄत्यू झाला. अपघाताची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. (Kolhapur Accident News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरगाव येथील अभिनव गौड हा मोटरसायकलवरुन (MHO9 FK OO18) राशिवडे खुर्दकडून शिरगावकडे येत होता. यावेळी मठाचे शेत नावाच्या शेताजवळ आल्यानंतर भरधाव असणाऱ्या अभिनवला रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकलची ओढ्याच्या पुलाला जोरात धडक बसली. यात त्याचा जागीच मॄत्यू झाला. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news