बालिकेचा बलात्कार करून खून

विधवा महिलेवर अत्‍याचार
विधवा महिलेवर अत्‍याचार

खोची येथील सहावर्षीय बालिकेचा बलात्कार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. नवीन मशिदीजवळ असणार्‍या दफनभूमीत तिचा मृतदेह सापडला. याप्रकरणी प्रदीप पोवार ऊर्फ बंड्या (वय 27) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याने वडगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची कबुली दिली.

ही मुलगी अंगणवाडीत शिकत होती.

रविवारी तिची आई रोजंदारीसाठी दुसर्‍याच्या शेतात गेली होती. परत आल्यानंतर मुलीचा जेवणाचा डबा तसाच असलेला तिला आढळला. ती न जेवता कुठे गेली, असा प्रश्‍न त्यांना पडला. दुपारी एक वाजल्यापासून त्यांनी तिला शोधायला सुरुवात केली. कुटुंबीयांसह गल्लीतल्या तरुणांनीही सर्वत्र शोधाशोध केली. घराशेजारी राहणार्‍या प्रदीप पोवारसोबत तिला मशिदीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाहिल्याचे काहींनी सांगितले. त्यानुसार युवकांच्या गटाने मशिदीजवळच्या दफनभूमी परिसरात शोधायला सुरुवात केली. या ठिकाणी एका झुडपाखाली तिचा मृतदेह सापडला. पोटच्या पोरीचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी आक्रोश केला. उपस्थितांचे डोळेही पाणावले. तिच्या अंगावर जखमेच्या खुणा होत्या. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. बलात्कार करून खून झाल्याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

वडगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्या पथकाने पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरला पाठवला. दरम्यान, संशयावरून प्रदीप पोवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

दंगल नियंत्रण पथक तैनात

या प्रकरणाचा तपास वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहेत. पोलिस प्रशासनाने तिच्या घराजवळ, घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक तसेच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news