Sahyadri Tiger Reserve | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘सरदार’नंतर ‘राणोजी’ची एन्ट्री

वाघांची संख्या झाली 10; वन विभागाच्या कॅमेर्‍यात कैद झाला ‘एसटीआर 10’
Sahyadri Tiger Reserve
वन विभागाच्या कॅमेर्‍यात कैद झालेला ‘राणोजी’.
Published on
Updated on

कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा वाघांच्या डरकाळी घुमू लागल्या आहेत. सरदारनंतर आता राणोजी (एसटीआर 10) या वाघाने एन्ट्री मारली आहे. राणोजी या नर वाघाचे राधानगरीच्या अभयारण्यात वास्तव्य दिसून आले असून वन विभागाच्या कॅमेर्‍यात तो कैद झाला आहे. आपली टेरिटरीदेखील त्याने मार्क केली आहे. राणोजीच्या आगमनामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि त्याला जोडणार्‍या राधानगरी परिसरात आता वाघांची एकूण संख्या 10 झाली असून, यात 7 नर आणि 3 मादी वाघांचा समावेश आहे.

नैसर्गिक स्थलांतराद्वारे सात नर वाघ या भागात स्थायिक झाले आहेत. सावंतवाडी-दोडामार्ग ते राधानगरी आणि पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंतचा वन्यजीव भ—मणमार्ग (कॉरिडॉर) अत्यंत सुरक्षित आणि पोषक असल्याचे यातून सिद्ध होत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ

सेनापती (एसटीआर 1), सुभेदार (एसटीआर 2), बाजी (एसटीआर 3), चंदा (एसटीआर 4), तारा (एसटीआर 5), हिरकणी (एसटीआर 6), रायबा (एसटीआर 7), सरदार (एसटीआर 8), शिलेदार (एसटीआर 9), राणोजी (एसटीआर 10) या दहा वाघांचे अस्तित्व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याला जोडणार्‍या राधानगरीमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news