Rankala Lake | रंकाळ्याच्या दगडी तटबंदीवरील धोकादायक झाडे-झुडपे काढली

रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीने राबवली स्वच्छता मोहीम
Rankala Lake |
कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरात झाडे-झुडपेमुक्त झालेल्या भिंती. (छाया : शिवराज सावंत)
Published on
Updated on

फुलेवाडी : रंकाळा टॉवर व राजघाट परिसरातील दगडी तटबंदीवर उगवलेल्या धोकादायक झाडा-झुडपांची रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीच्या सदस्यांनी शनिवारी स्वच्छता केली. या झाडांची मुळे दगडात शिरल्यामुळे तटबंदीला तडे जाऊन संरक्षक भिंत पडण्याचा धोका निर्माण झाला होता.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत दैनिक 'पुढारी'ने 'पिंपळ आणि किती वाढणार?' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. महापालिकेकडून कामगारांचे कारण सांगून टाळाटाळ केली जात असल्याने, 'पुढारी'च्या बातमीची दखल घेत संवर्धन समितीच्या सदस्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ही मोहीम हाती घेतली आणि तटबंदीवरील सर्व झाडे काढून परिसर स्वच्छ केला. या मोहिमेत रंकाळा संवर्धन समितीचे संजय मांगलेकर, यशवंत पाटील, प्रा. एस. पी. चौगले, प्रमोद सरनाईक, राजेंद्र पाटील, राजेंद्र इनामदार, धनंजय लिंगम, इंद्रजीत साळोखे, अभिजित चौगले, आनंदराव कोरे, दिनकर लाळगे आणि प्रतीक गावड सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news