kolhapur | रंजन शर्मा कोल्हापूरचे नवे पोलिस महानिरीक्षक

फुलारींची ‘सीआयडी’त बदली
new police appointment
kolhapur | रंजन शर्मा कोल्हापूरचे नवे पोलिस महानिरीक्षक
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) विशेष पोलिस महानिरीक्षकपदी शुक्रवारी नियुक्ती झाली. तर, पुणे येथील पोलिस सहआयुक्त रंजन शर्मा यांच्यावर कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. शर्मा 25 मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत.

फुलारी यांनी डिसेंबर 2022 मध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत फुलारी यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण क्षेत्रात संघटित गुन्हेगारीविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत म्होरक्यांसह साथीदारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारला होता.

रंजन शर्मा महाराष्ट्र केडरचे 2006 बॅचचे भारतीय पोलिस सेवा अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेतून थेट भरतीद्वारे सेवेत प्रवेश केला. सध्या पुणे शहर सहआयुक्त पदावर ते कार्यरत होते. त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र पोलिस दलात महत्त्वाच्या पदावर जबाबदारी सांभाळली आहे. गुन्हे अन्वेषण, कायदा-सुव्यवस्था, संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात सक्रिय, अशी त्यांची प्रतिमा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news