कोल्हापूर : हिलाल कमिटीची (चांद कमिटी) मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डिंगच्या कार्यालयामध्ये गुरुवारी (दि. 19) रमजान ईद संदर्भात मगरीब नमाजनंतर बैठक झाली. यावेळी मुंबई हिलाल कमिटी, बेंगलोर, लखनौ, दिल्ली, देववंद, रत्नागिरी, रायगड इंडी तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. या ठिकाणाहून चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्याने कोल्हापूरमध्ये शनिवारी (दि. 21) रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय उलमा हिलाल कमिटीचे अध्यक्ष मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केला.
यामध्ये शनिवारी सकाळी 8.50 वाजता विक्रमनगर, सिरत मोहल्ला, सदर बाजार, जमादार कॉलनी येथील मस्जिदमध्ये ईदची नमाज पठण होणार आहे. याचबरोबर 8.45 वा. बम्हपुरी, केसापूर, यादवनगर, 8.50 वा. न्यू शाहूपुरी, 9 वा. कबस्थान मस्जिद, बडी मस्जिद, शाहूपुरी थोरली मस्जिद, लक्षतीर्थ, बाराईमाम, निहाल मस्जिद मरकज, सरदार कॉलनी, राजेबागस्वार दर्गा, टाकळा, उचगाव, कदमवाडी, अकबर मोहल्ला, रंकाळा मस्जिद, 9.15 वा. गवंडी मोहल्ला, 9.30 वाजता मुस्लिम बोर्डिंग, घुडणपीर, बाबुजमाल आणि उत्तरेश्वर पेठ मस्जिदमध्ये ईदचे नमाज पठण होणार आहे. यावेळी गणी आजरेकर, इरफान कसमी, अब्दुलसलाम कासमी, मुबीन बागवान, नाझिम पठाण, आमीन अथणीकर आदी उपस्थित होते.