Raksha Bandhan 2024 | बहिणीने केला भावाच्या आयुष्याचा धागा घट्ट

सुजाता, सचिन लोहार या बहीण-भावाच्या नात्याची अशीही वीण
Raksha Bandhan
रक्षाबंधन साजरे करताना सचिन आणि बहीण डॉ. सुजाता. छाया ः अर्जुन टाकळकर) FILE PHOTO
Published on
Updated on

कोल्हापूर : बहीण-भावाच्या नात्याला बांधून ठेवतो तो राखीचा धागा. कोल्हापुरातील डॉ. सुजाता लोहार यांनी राखीच्या धाग्यासोबत मोठा भाऊ सचिन लोहार यांच्या आयुष्याचा उसवणारा धागाही घट्ट केला. डॉ. सुजाता यांनी भाऊ सचिन यांना स्वत:ची किडनी दान करत भावाचे आयुष्य सुरक्षित केले.

डॉ. सुजाता लोहार या फुलेवाडी येथे राहतात. राजारामपुरी येथे त्यांचे माहेर आहे. लोहार कुटुंबातील ही भावंडे. सुजाता यांच्यापेक्षा सचिन हे तीन वर्षांनी मोठे. वर्षभरापूर्वी सचिन यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. डेंग्यूमुळे सचिन यांची तब्येत बिघडली. पुण्यातील नोकरी सोडून ते पत्नी व दहा वर्षांच्या मुलासह कोल्हापूरला आले. कोल्हापुरात त्यांना दर दोन दिवसांनी डायलेसिस करावे लागे. याचा परिणाम किडनीवर झाला. तब्येत इतकी खालावली की श्वास घेणेही मुश्कील झाले. किडनी मिळाली तरच जीव वाचेल, असे निदान डॉक्टरांनी केले.

किडनीदात्याचा शोध सुरू झाला. मात्र, यात खूप वेळ जात होता. वृद्ध आई-वडील, दहा वर्षांचा भाचा, वहिनीच्या चेहर्‍यावर काळजी पाहून सुजाता यांनी भावाला किडनी देण्याची तयारी दर्शवली. सुजाता यांच्या पतीसह सासरच्या लोकांचाही त्यांना पाठिंबा मिळाला. सुजाता यांचा मुलगा अडीच वर्षांचा होता. दरम्यान, एकाच वेळी दोन्ही मुलांवर शस्त्रक्रिया होणार या विचाराने आई-वडील धास्तावले; पण त्यांनाही सुजाता यांनी धीर दिला. आवश्यक चाचण्यांनंतर किडनी प्रत्यारोपण झाले. बहीण सुजातामुळे भाऊ सचिन यांना नवे आयुष्य मिळाले.

Raksha Bandhan
Raksha Bandhan 2024 | ओवाळणीत बहिणीला जीवनदान

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news