

कोल्हापूर : सागर यादव
Rajmata Jijau Jayanti | महाराष्ट्र राज्य शासनाने गतवर्षीपासून राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला. शिवछत्रपतींच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ३ लाख ५० हजार युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र, कोल्हापुरातील महिला-मुलींना शिवकालीन युद्धकलेचा वारसा गेल्या अनेक दशकांपासून अखंड जपला आहे. शहर व ग्रामीण भागातील आखाड्यांमध्ये मोठ्या संख्येने मुली मर्दानी खेळांचे धडे घेत आहेत.
कोल्हापुरात मर्दानी खेळाचा वारसा मुलींनी अखंड जपला आहे. शिवानी कटके, ड. विद्या यादव, स्नेहल गायकवाड, विद्या साळोखे, वर्षा गवळी, वसुंधरा गवळी, अंबिका सोळंकी यांच्यानंतर अश्विनी जाधव- कसवेकर, दीपिका यादव, राधिका करंबे, प्रियांका पाटील, सारिका करंबे, गौरी महाडिक, योगिता साळोखे, रोहिणी वाघ, सायली बिरंजे, मेघा माळी यांनी युध्दकलेचे धडे घेतले. पाठोपाठ गायत्री पोवार, स्वाती जाधव, स्मिता पाटील, चारुलता वणीरे, विद्या सुतार, मनिषा जाधव, कवीता मेस्त्री, स्वाती इंगळे, ज्योती इंगळे, जानव्ही पाटील, प्रियांका बोंद्रे, स्नेहल बोंद्रे, साऊ पेडणेकर, पूजा पाटील, नलीन वाघ, वर्षा भांदिगिरे, वेदिका खांडेकर, प्राजक्ता गवळी, शिवानी पाटील, प्रियंका पाटील यांनी ही परंपरा अखंड पुढे सुरू ठेवली.
नव्या पिढीतील पूजा पाटील, वृंदा सावंत, ईश्वरी भोसले, जानवी लोहार, रमा देसाई, परी लोहार, जानव्ही निंबाळकर, साक्षी तोरस्कर, निशा सकोजी, स्वरा निंबाळकर, श्रावणी म्हाळुंगे, वेदिका पाटील, स्वरा पाटील, गौरी शिंदे, समृध्दी पाटील, सिध्दी पाटील, तरंगीणी माने, वैष्णवी वास्कर, आरुषी खटावकर, आराध्या खानविलकर, मानसी सावंत, संस्कृती साळोखे, धर्माज्ञा साळोखे, तृप्ती जाधव, विधीनंदिनी घोरपडे, प्रतीक्षा डवंग, शिवराई यादव, सई थोरवत, शौर्या थोरवत, भार्गवी भोसले, ज्ञानेश्वरी भोसले, जोया आगा, कल्याणी खोपकर, ज्योती पाटील, राजेश्वरी उरुणकल, मनाली लंबे, अण्वी जगताप, राजलक्ष्मी माने, मनस्वी काशीद, पूर्वा भोसले युध्दकलेचे धडे घेत आहेत.
सह्याद्री प्रतिष्ठान शाखा रामानंदनगर, जुना बुधवार, कसबा बावडा, खंडोबा वेताळ मर्दानी आखाडा, नंगीवली तालीम, सणगर- बोडके तालीम, मर्दानी खेळाचा आखाडा, जयजवान फेकणे मंडळ, सुबराव गवळी आखाडा, बजापराव माने, नाथागोळे, महाकाली तालीम शिवगर्जना मर्दानी आखाडा, शिवशाहू मर्दानी आखाडा, राजे मर्दानी आखाडा, कै. आनंदराव पोवार मर्दानी आखाडा, हिंद प्रतिष्ठान, चाणक्य आखाडा, स्वराज्यरक्षक शिवबाचा मावळा आखाडा, जयभवानी मर्दानी आखाडा, शंभूराजे मर्दानी आखाडा, कोल्हापूर मर्दानी खेळ आखाडा, सव्यासाची गुरुकुलम, राजमुद्रा प्रतिष्ठान, छत्रपती ब्रिगेड आदी आखाडे सक्रिय आहेत.