Rajesh Kshirsagar | शिवसेनाप्रमुखांचे विचार अन् लोकसेवेचा वसा अखंडित जपणार

वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील २१ दिंड्यांना टाळ-मृदंगांचे वाटप, गरजूंना मदतीचा हात
कोल्हापूर : केक कापून वाढदिवस साजरा करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष 
आ. राजेश क्षीरसागर. शेजारी वैशाली क्षीरसागर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर व इतर.
कोल्हापूर : केक कापून वाढदिवस साजरा करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर. शेजारी वैशाली क्षीरसागर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर व इतर. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले विचार, सर्वसामान्यांच्या सेवेसाठी झटण्याची शिकवण आणि लोकसेवेचा वसा अखंडितपणे पुढे सुरू ठेवणार, असा निर्धार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि. २४) व्यक्त केला.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेच्या विविध विभागांच्या वतीने सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यातील २१ दिंड्यांना टाळ-मृदंगांचे वाटप, गोमातेसाठी चारा व पशुखाद्य, गरजूंना ब्लँकेट, अंध विद्यार्थ्यांना उबदार कपडे, रुग्णांना जीवनावश्यक वस्तू, अनाथ मुलांना फळवाटप आदी उपक्रमांचा समावेश होता. शनिवार पेठ येथील शिवालय कार्यालयात आ. राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माजी आ. सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, समन्वयक विनायक साळोखे, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, शिक्षण सभापती शीला सोनुले, परिवहन सभापती सत्यजित जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, दिशा क्षीरसागर, पूजा क्षीरसागर, नगरसेविका मंगल साळोखे, वंदना मोहिते, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, प्राजक्ता जाधव, संगीता सावंत, नगरसेवक वैभव माने, अजय इंगवले, अश्किन आजरेकर, स्वरूप कदम, अभिजित खतकर, शहरप्रमुख रणजीत जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. क्षीरसागर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण आणि समाजकारण करण्याची शिकवण दिली. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे आणि लोकसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हेच आपले ध्येय आहे. पद, प्रतिष्ठा आणि सत्ता यापेक्षा जनतेने दाखविलेला विश्वास आणि प्रेम हीच आपली खरी ताकद आहे. जनतेच्या आशीर्वादातून विकासकामे आणि समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी कटिबद्ध आहे.

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

आ. राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा. श्रीकांत शिंदे, खा. शाहू महाराज, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आ. विनय कोरे, माजी आ. मालोजीराजे, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आ. चंद्रदीप नरके, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राहुल आवाडे, आ. अशोकराव माने, माजी खा. संजय मंडलिक, माजी आ. सुजित मिणचेकर, माजी आ. जयंत आसगांवकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.