MLA Rajesh Kshirsagar : 'सतेज पाटलांनी बदनामीचे षडयंत्र थांबवून स्वतःच्या निष्क्रियतेचे आत्मपरीक्षण करावे' : आ. क्षीरसागर

व्‍हायरल व्हिडिओ पूर्णपणे एडिटेड आणि डब केलेला; संबंधित व्यक्तीचेच लेखी पत्र
MLA Rajesh Kshirsagar press conference
MLA Rajesh Kshirsagar press conferencePudhari
Published on
Updated on

MLA Rajesh Kshirsagar press conference

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : "काचेच्या महालात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. अनेकांच्या कौटुंबिक कुंडल्या माझ्याकडे तयार आहेत," असा इशारा देत सतेज पाटलांनी बदनामीचे षडयंत्र थांबवून स्वतःच्या निष्क्रियतेचे आत्मपरीक्षण करावे, अशा शब्‍दांमध्‍ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्हायरल होत असलेल्या कथित व्हिडिओप्रकरणी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. या पत्रकार परिषदेला महायुतीचे स्‍थानिक नेते उपस्‍थित होते.

व्हिडिओ पूर्णपणे एडिटेड आणि डब केलेला; संबंधित व्यक्तीचेच लेखी पत्र

व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आमदार सतेज पाटील यांचाच हात असल्याचा पुनरुच्चार करत राजेश क्षीरसागर म्हणाले, "माझ्या पाठीशी महायुतीचे नेते आणि जनता ठामपणे उभी आहे. माझ्याकडे कोणतं कॉलेज नाही, जिथून डोनेशन येईल, ना माझ्याकडे कोणतं हॉस्पिटल आहे. मी एका सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहे. सतेज पाटील यांनी आव्हान दिले म्हणूनच मी आज ही पत्रकार परिषद घेत आहे, कोणत्याही खुनाच्या खटल्यातील व्यक्तीसाठी किंवा ब्लॅकमेलरसाठी मी इथे आलेलो नाही. व्हायरल झालेला 'तो' व्हिडिओ पूर्णपणे एडिटेड असून त्याचे व्हॉईस डबिंग करण्यात आले आहे. खुद्द संबंधित व्यक्तीनेच तसे लेखी पत्र आणि पुरावे दिले आहेत. मी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला मदत केली आहे, वेळ आल्यावर ते मी सर्वांसमोर आणणारच," असेही त्यांनी स्पष्ट केले.

MLA Rajesh Kshirsagar press conference
Rituraj Kshirsagar | रविकिरण इंगवले ब्लॅकमेलर; आम्ही त्याला भीक घालत नाही

...मग आधीच्या तक्रारीत काय तथ्य निघालं?

"यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशीही सतेज पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन हाच व्हिडिओ दाखवला होता. त्यांनी याची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही केली होती. मग पुढे त्यात काही तथ्य निघालं का?" असा सवाल राजेश क्षीरसागर यांनी केला. कोल्हापुरातल्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाचा व्हिडिओ एका व्यक्तीकडे आला होता आणि त्याने त्या मोठ्या नेत्याला सुद्धा ब्लॅकमेल केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी यावेळी केला. कोल्हापूरच्या जनतेने विधानसभा आणि महापालिकेत काँग्रेसचा '१०-०' पराभव करून सतेज पाटलांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

MLA Rajesh Kshirsagar press conference
Rajesh Kshirsagar | सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांच्या माथी मारलेल्या टोलचे ७५० कोटी महायुतीने भागवले

एआयचा वापर करुन व्‍हिडिओ : आदिल फरास

पत्रकार परिषदेत उपस्थित महायुतीच्या नेत्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा निषेध केला. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आदिल फरास म्‍हणाले की, "कोणतीही पडताळणी न करता एआय (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. यापूर्वी गोवा येथील कॅसिनोमधील व्हिडिओ व्हायरल केला गेला होता. मात्र, गोवा येथील कॅसिनो हे तिथले एक आकर्षण आहे, अनेकजण तिथे जातात, राजकीय द्वेषातून असे आरोप केले जात आहेत.

MLA Rajesh Kshirsagar press conference
Gokul election | महायुतीची वज्रमूठ; सतेज पाटील यांचा एकाकी लढा

महायुती क्षीरसागर यांच्या पाठीशी : विजय जाधव

"आजवर कोल्हापूर शहरात कोणत्याही आमदाराने आणला नसेल एवढा मोठा विकासनिधी आमदार क्षीरसागर यांनी आणला आहे. आता त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहेत. संपूर्ण भाजप आणि महायुती क्षीरसागर यांच्या पाठीशी ठाम आहे." भाजपचे विजय जाधव यांनी सांगितले. ज्या पद्धतीने आमदार क्षीरसागर यांच्यावर चिखलफेक केली जात आहे, ती राजकीय संस्कृतीला धरून नाही. आम्ही सर्वजण आणि आमचा पक्ष त्यांच्या सोबत आहोत," असे जनसुराज्य शक्ती उपमहापौर अक्षय जरग यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news