Gokul Election | समविचारी आघाडीचे पॅनेलप्रमुख महायुतीच्‍या गळाला; आमदार सतेज पाटील यांना धक्‍का

Gokul Election |
Gokul Election | समविचारी आघाडीचे पॅनेलप्रमुख महायुतीच्‍या गळाला; आमदार सतेज पाटील यांना धक्‍का
Published on
Updated on

कोल्‍हापूर : काँग्रेस नेते आ. सतेज पाटील यांच्‍या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे पॅनेलप्रमुखच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्‍या गळाला लागले. आ. पाटील यांच्‍यासाठी हा धक्‍का आहे. राष्‍ट्रवादीच्‍या शक्तिप्रदर्शनादरम्‍यान आ. पाटील यांनी उभारलेल्‍या फलकांवर गोकुळचे माजी अध्‍यक्ष अरुण नरके यांचा फोटो होता; मात्र आता डॉ. चेतन नरके भाजपसोबत गेल्‍याने महाडिक-नरके यांची मैत्री, मनपा आघाडी पुन्‍हा चर्चेत आली.

गोकुळमध्‍ये तीन दशके माजी आ. पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, गोकुळचे माजी अध्‍यक्ष अरुण नरके यांची सत्ता होती. मागील निवडणुकीत त्‍यांचे चार संचालक निवडून आले. यानंतर त्‍यांच्‍या मैत्रीमध्‍ये अंतर पडले. दरम्‍यान, मे २०२४ मध्‍ये आ. पी. एन. पाटील यांचे निधन झाले, तर अरुण नरके राजकारणातून अलिप्‍त झाले. काही दिवसांपूर्वी आ. सतेज पाटील यांनी शहरात केलेल्‍या पोस्‍टरबाजीमध्‍ये अरुण नरके यांचा फोटो होता. त्‍यामुळे नरके आ. पाटील यांच्‍यासोबत जाणार हे निश्‍चित होते. दरम्‍यान, महादेवराव महाडिक यांनी अरुण नरके यांची भेट घेतल्‍याचे समजते. भेटीमधून जुन्‍या मित्राला पुन्‍हा आपल्‍यासोबत आणण्‍यास त्‍यांना यश आले आहे.

भाजप मेळाव्‍यात महाडिक-नरकेंची एकत्र एन्ट्री

महासैनिक दरबार हॉल येथे सोमवारी (दि. २९) भाजप ठरावधारकांचा मेळावा होणार आहे. कसबा बावडा येथील राजाराम कारखाना येथे महादेवराव महाडिक, अरुण नरके, डॉ. चेतन नरके एकत्र येणार आहेत. तेथून महाडिक व नरके भाजप मेळाव्‍यामध्‍ये एकत्र एन्ट्री करणार आहेत.

मनपा आघाडी पुन्‍हा चर्चेत

माजी आ. महादेवराव महाडिक, अरुण नरके पुन्‍हा एकत्र आल्‍याचे रविवारी निश्‍चित झाले. त्‍यानंतर त्‍यांच्‍या कार्यकर्त्यांनी स्‍व. पी. एन. पाटील, महाडिक, नरके यांची एकत्रित जुनी छायाचित्रे सोशल मीडियावर व्‍हायरल केली. त्‍यामुळे मनपा आघाडी पुन्‍हा चर्चेत आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news