Rajarshi Shahu Maharaj Birthplace | राजर्षी शाहू जन्मस्थळ विस्तारित होणार

Rajarshi Shahu Maharaj Birthplace |
Rajarshi Shahu Maharaj Birthplace | राजर्षी शाहू जन्मस्थळ विस्तारित होणार
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : कसबा बावडा लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजर्षी शाहू जन्मस्थळाचा विस्तार होणार आहे. मूळ जमिनीत आणखी अडीच एकर जागा जोडली जाणार आहे.

शाहू जन्मस्थळाच्या एकूण क्षेत्रापैकी अडीच एकर जागा कृषी विभागाकडे होती. ते क्षेत्र शाहू जन्मस्थळात समाविष्ट व्हावे यासाठी सुमारे दहा वर्षे पाठपुरावा सुरू होता. यासाठी अनेक वेळा निवेदन, मंत्री महोदय, जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभाग, भूमी अभिलेख विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गांभीर्यपूर्ण लक्ष घातल्याने नुकतीच मोजणी होऊन जन्मस्थळाच्या क्षेत्रामध्ये अडीच एकर क्षेत्र समाविष्ट झाले.

या घटनेने राजर्षी शाहू जन्मस्थळ भव्यतेने विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला. याकामी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, भूमी अभिलेख अधिकारी किरण माने, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, कृषी विभागाचे अधिकारी, तसेच पुरातत्त्व विभागाचे उदय सुर्वे, उत्तम कांबळे, राजर्षी शाहू जन्मस्थळ विकास व संवर्धन समिती सदस्य वसंतराव मुळीक व इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत व तमाम शाहू प्रेमींंनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news