Radhanagari Dam | पावसाचे पुन्हा कमबॅक : दोन धरणांत अतिवृष्टी; राधानगरीचे दोन दरवाजे खुले

Radhanagari Dam |
Radhanagari Dam | पावसाचे पुन्हा कमबॅक : दोन धरणांत अतिवृष्टी; राधानगरीचे दोन दरवाजे खुले Pudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा कमबॅक केलेे. रविवारीदेखील शहरात दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या २४ तासांत गगनबावडा गावासह कुंभी, कोदे धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे दोन दरवाजे दुपारी खुले झाले. धरणातून एकूण २,८२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाच्या पॉवर हाऊसमधूनदेखील ९०० घनफूट प्रतिसेंकद विसर्ग सुरू झाला आहे.

पंचगंगा १८.१० फुटांवर

दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात १ फूट १० इंचांची वाढ होऊन रात्री ९ वाजता पातळी १८ फूट १० इंचांवर होती. जिल्ह्यातील ८ बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news