

इचलकरंजी : शहरात तीन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गावभाग तसेच कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापे टाकून अड्डाचालकासह 29 जणांना अटक केली. तसेच 3 लाख 42 हजार 443 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विक्रमनगर परिसरात शेडमध्ये जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला. यावेळी किरण मल्लाप्पा कवटगे (वय 52, रा. चंदूर), अर्जुन मारुती कुडाळकर (45, रा. जाधव मळा), राहुल अशोक लोटके (42, रा. जवाहरनगर), संजय रमेश माने (45 रा. शेळके गल्ली), नितीन बाळासो निंबाळकर (37, रा. आसरानगर), सूरज नंदकिशोर सिंदकर (30, रा. लोटस पार्क), ओंकार दतात्रय डाकरे (29, रा. स्वामी मळा) व अड्डाचालक इम्तियाज बालम बागवान (46, रा. स्वामी मळा) यांना अटक केली. अंमलदार दयानंद हुजरे यांनी फिर्याद दिली आहे. आसरानगर परिसरात गणेश बागडी याच्या खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी अड्डा चालक महादेव नरस्त्रप्पा बोगा (30, रा. साईट क्र. 102) व गणेश बागडीसह चंद्रकांत महादेव शिंगाडे (50), अनिलसिंग किरणसिंग शिख (19), वैभव अनिल साठे (25), ओंकार श्रीपती ढमणगे (20), उमेश निरज मछले (25, सर्व रा. साईट क्र. 102) आणि आदित्य अविनाश निंबाळकर (20, रा.आसरानगर) यांना अटक केली. याप्रकरणी विशाल चौगले यांनी फिर्याद दिली.
शाहू कॉर्नर परिसरात सुवर्णयुग मंडळाच्या इमारतीमध्ये गावभाग पोलिसांनी छापा टाकला. यावेळी क्लब मॅनेजर प्रकाश सदाशिव भिसे (वय 45, रा. बंडगर मळा) व मालक शाहनूर इसाक सावळगी (48, रा. हत्ती चौक) यांच्यासह अमित विलास आळंदे (40, रा. गणेशनगर), स्वप्निल तानाजी काळे (36, रा. नारायणनगर), ताजुद्दीन कमरुद्दीन विजापुरे (48, रा. राजीव गांधीनगर), संतोष विलास बाबर (48, रा. कागवाडे मळा), रफीक मलीक मिरजे (43, रा. कारंडे मळा), पांडुरंग बाबुराव कांबळे (54, रा. सुतार मळा), बंदेनवाज रसुलसो मकानदार (38, रा. नेहरूनगर), विशाल किरण कांबळे (25, रा. टाकवडे वेस), दिलावर अजीज बागवान (59, रा. कोले मळा), आयुब हबीबमहंमद अन्सारी (49, रा. हत्ती चौक), नितीन शामराव जावळे (40, रा. लाखेनगर) यांना अटक केली. कॉन्स्टेबल जयदीप बागडे यांनी फिर्याद दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक महेश चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली.