

कोल्हापूर : पडवळवाडी (ता. करवीर) येथील डोंगर पायथ्याशी टेंटमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर संयुक्त पोलिस पथकाने छापा टाकून 15 जणांवर गुन्हा दाखल केला. 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रोख रकमेसह 4 मोटारी, रिक्षा, 8 दुचाकी असा 19 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संतोष संताजी पाटील (वय 46, रा. विलासनगर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले), राजू रावसाहेब लांबोरे (27, घाडगे कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर), विनायक रावसाहेब पाटील (31, गणेश कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), तुषार दशरथ निकम (19, रेणुकानगर, शिरोली पुलाची), अमोल कृष्णा नाळे (39, विलासनगर, शिरोली पुलाची), चंद्रकांत बंडू कागले (51, राजगुरूनगर, हुपरी, ता. हातकणंगले), निखिल गंगाराम सगट (राजेंद्रनगर, कोल्हापूर), विश्वास सदाशिव जगताप (55, कळंबा, करवीर), दिगंबर गोंविद पाटील (48, लक्षतीर्थ कमानीजवळ, रेणुका मंदिराजवळ, कोल्हापूर), सतीश प्रकाश रावळ (32, विठ्ठल चौक, हुपरी) अशी ताब्यात घेतल्यांची नावे आहेत. 4 ते5 जणांना पलायन केले आहे. त्याच्यावरही कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. कारवाईत 47 हजार 230 रुपये रोख, 11 मोबाईल, 8 दुचाकी, चार मोटारी, रिक्षा, लाल रंगाची बॅटरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल मंगेश माने यांनी फिर्याद दाखल केली आहे.