

कोल्हापूर : शहरातील बलराम कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख 43 हजार रुपये, 13 मोबाईल, 4 मोटारसायकलींसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अझरुद्दीन नौशाद नदाफ याच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर 29 जुलै रोजी सायंकाळी 7.20 वाजता ही कारवाई करण्यात आली.
आरोपींची नावे अशी : अझरुद्दीन नौशाद नदाफ (वय 34, रा. लक्षतीर्थ वसाहत, रेडेकर गल्ली), अक्षद अनिल दवडते (19, रा. जोशी गल्ली, लक्षतीर्थ वसाहत), गौतम उदय कदम (26, रा. माळवाडी बालिंगा, ता. करवीर), संतोष सोनबा बोडके (32, रा. सासने कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत), प्रवीण पुंडलिक भोसले (30, रा. गणपती मंदिर जवळ, बालिंगा, ता. करवीर), सुजल सागर मायणीकर (20, रा. शेवटचा बस स्टॉप, लक्षतीर्थ वसाहत), सुनील लिंग्गाप्पा काळे (26, रा. नागदेववाडी, ता. करवीर), गणेश सुरेश वास्कर (35, रा. साई गल्ली, लक्षतीर्थ वसाहत), रोहित दिलीप गोसावी (26, रा. साई गल्ली, लक्षतीर्थ वसाहत), नितीन किसन शिंदे (45, रा. कारंडे गल्ली, लक्षतीर्थ वसाहत), संजय कोंडीबा देवणे (30, रा. सासने कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत), विशाल बाबासाहेब पाटील (35, रा. तिसरा स्टॉप, फुलेवाडी), साहेबलाल बाबू शेख (46, रा. लक्षतीर्थ वसाहत), चंद्रकांत गोविंद खोंदल (22, रा. गणेशनगर, शिंगणापूर)