Radhangari Wild life | वन्यजीवांसाठी राधानगरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा स्तुत्‍य उपक्रम : स्वच्छता करुन अभयारण्यातील पानवठे केले मोकळे!

सामाजिक बांधिलकी जपत अभयारण्य क्षेत्रातील मांजरखिंड परिसरातील पानवठ्याची स्वच्छता मोहीम
Radhangari Wild life
राधानगरी - मांजरखिंड येथील पानवठ्याची स्वच्छता करताना पोलीस कर्मचारी
Published on
Updated on

नंदू गुरव

राधानगरी : येथील पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अभयारण्य क्षेत्रातील मांजरखिंड परिसरातील पानवठ्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.. जंगलातील नैसर्गिक पाणवठे गाळाने व कचऱ्याने भरून आटत चालल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी जंगलाबाहेर यावे लागत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान वाढण्याबरोबरच मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पोलिस हवालदार अशोक शेळके राधानगरी बीट अंमलदार, गोपनीय गजानन गुरव, महेश गुरवपुढाकार घेत पानवठ्यांमधील गाळ, प्लास्टिक व इतर कचरा काढून त्यांची स्वच्छता केली. काही ठिकाणी पाण्याचा साठा वाढवण्यासाठी छोटे दुरुस्ती कामही करण्यात आले. या उपक्रमामुळे पाणवठ्यांची पाणी साठवण क्षमता वाढली असून वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंगलातील पाण्याची टंचाई टाळण्यासाठी अशा स्वच्छता मोहिमा अधिक प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे मत राधानगरी पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news