

गुडाळ : आशिष पाटील
आज (शुक्रवार) राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर पावसाचा जोर कमी राहिला. यामुळे सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी राधानगरी धरणाचा तीन नंबरचा दरवाजा बंद झाला आहे.
तत्पूर्वी दुपारी एक वाजून चार मिनिटांनी क्रमांक एकचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला होता. आता केवळ चार स्वयंचलित दरवाजे सुरू आहेत. हे चार दरवाजे आणि पॉवर हाऊस मधून मिळून एकूण 7212 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.