Radhanagari Dam : राधानगरी धरण ९४ टक्के भरले

उद्या स्वयंचालित दरवाजे खुले होण्याची शक्यता; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
Radhanagari Dam is 94 percent filled
Radhanagari Dam : राधानगरी धरण ९४ टक्के भरले Pudhari Photo
Published on
Updated on

राधानगरी : नंदू गुरव

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण 94 टक्के भरले आहे. धरण 347.50 फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर कायम राहिल्यास आज धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचालित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. सध्याची पुरस्थिती पाहता नंदिकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

Radhanagari Dam is 94 percent filled
Kolhapur Flood | कोल्हापूरला पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर

मंगळवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात 120 मिमी तर दुपारी चार वाजता संपलेल्या दहा तासात 58 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुनपासून आज अखेर 2733 मिमी पाऊस झाला आहे. धरणाची पाणी पातळी 344.62 फूट असून पाणीसाठा - 7817.55 द.ल.घ.फु झाला आहे.

Radhanagari Dam is 94 percent filled
Kolhapur Rain Update | पूरस्थितीसाठी प्रशानस सज्ज; निवारा केंद्राची व्यवस्था

धरणातून विद्युतगृहासाठी 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आज धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news