Radhanagari Dam : धरणातील पाणी पातळी स्‍थिर; चारही स्‍वयंचलित दरवाजे अद्याप खुलेच

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी
Radhanagari Dam : Dam water level stable; All four automatic doors are still open
Radhanagari Dam : धरणातील पाणी पातळी स्‍थिर; चारही स्‍वयंचलित दरवाजे अद्याप खुलेच Pudhari Photo

गुडाळ : आशिष पाटील

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज (शनिवार) दिवसभर पावसाचा जोर कमी असल्यामुळे धरणातील पाणी पातळी स्थिर असून, दुपारी चार वाजताच्या मोजणीप्रमाणे पाणी पातळी 346.97 एवढी आहे. धरणक्षेत्रात दुपारी चार पर्यंत 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणाचे काल (शुक्रवार) सायंकाळ पासून सुरु असलेले चार ही स्वयंचलित दरवाजे अद्याप खुलेच आहेत. (Radhanagari Dam)

Radhanagari Dam : Dam water level stable; All four automatic doors are still open
Kolhapur Flood updates | कोल्हापूर : महापुराचे पाणी शहरात घुसले, नागरिकांचे स्थलांतर

सध्या धरणात 8259.57 दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा असून, चार स्वयंचलित दरवाज्यातून 5712 क्यूसेक तर विद्युत निर्मितीसाठी 1500 क्यूसेक असा एकूण 7212 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरूच आहे.(Radhanagari Dam)

Radhanagari Dam : Dam water level stable; All four automatic doors are still open
Almatti Dam- Kolhapur Flood Updates | अलमट्टीतून ३ लाख क्सुसेक पाण्याचा विसर्ग

राधानगरी धरण परिसरात पाऊस कमी असला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे टोक असलेल्या दाजीपूर-हसणे परिसरापासून अलीकडे पाणलोट क्षेत्रात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरूच आहे. परिणामी धरणातून 7212 क्यूसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरू असूनही धरणातील पाणी पातळी मात्र स्थिरच राहिली आहे.(Radhanagari Dam)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news