Kolhapur Crime News | मध्यवर्ती बसस्थानकातून दागिने चोरणार्‍या पुण्यातील महिलेला अटक

Kolhapur Crime News |
Kolhapur Crime News | मध्यवर्ती बसस्थानकातून दागिने चोरणार्‍या पुण्यातील महिलेला अटक
Published on
Updated on

कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलांचे सोन्याचे दागिने, रोख रकमेवर डल्ला मारणार्‍या महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषणने पुण्यातून अटक केले. सविता गोविंद अवताडे (वय 40, रा. अरविंद कॉम्प्लेक्स, हिंगणे, सिंहगड रोड पुणे, मूळ आष्टा कासार, ता. लोहारा, जि. धाराशिव) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून 2 लाख 89 हजार 800 रुपये किमतीचे 27.540 ग्रॅम दागिने हस्तगत केले.

संशयित महिलेने विद्युलता धनंजय जाइव (रा. इश्वरपूर, ता. वाळवा) व छाया श्रीपती मालप (रा. कदमवाडी, कोल्हापूर) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, साखळी व पर्समधील रोकड लंपास केली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अनिल जाधव, अमित सर्जेसह पथकाने तांत्रिकद़ृष्ट्या तपास करीत सविता अवताडे हिचे नाव निष्पन्न केले. महिलेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.

उच्चभू्र कॉलनीत वास्तव्य; मात्र चोरीचे ढीगभर कारनामे

‘एलसीबी’ पथकाने अटक केलेली सविता अवताडे सराईत गुन्हेगार असून, तिच्यावर पुण्यासह अक्कलकोट, इस्लामपूर, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. दोन उच्चशिक्षित मुले, पतीसह पुण्यातील उच्चभू्र कॉलनीत महिलेचा फ्लॅट आहे. धाराशिव मूळचे गाव, गावाकडे जाते, असे सांगून महिला चोरीसाठी भटकत असते. मुंबई, पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली बसस्थानकावर गर्दीच्या ठिकाणी तिचा वावर असतो, अशी माहिती उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news