

कोल्हापूर : समाजोपयोगी उपक्रमांसाठी सातत्याने अग्रेसर असलेल्या ‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या युवा नेतृत्वांचा गौरव करण्यासाठी ‘पुढारी युवा आयकॉन 2025’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. आपल्या कार्यकुशलतेने, नवकल्पनांद्वारे व सामाजिक भान जपत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणार्या युवांचा या मंचावर सन्मान करण्यात येणार आहे.
यावर्षीच्या ‘पुढारी युवा आयकॉन’ सन्मानासाठी निवड झालेल्या मान्यवरांना शनिवारी (दि. 26) पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे युवा प्रेरणास्रोतांचा गौरव करून, समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ‘पुढारी’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात कोल्हापुरातील डॉक्टर्स, ?उद्योजक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्या युवकांना सन्मानित करण्यात येणार आहे.