Kolhapur News : ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशनचे उद्या थाटात उद्‌घाटन

सहलीच्या विविध पॅकेजेससह प्रदर्शन पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज
Kolhapur News
‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशनचे उद्या थाटात उद्‌घाटन
Published on
Updated on

कोल्हापूर : पर्यटनप्रेमी कोल्हापूरकरांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरलेल्या ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन्स २०२६’ चे उद्या, दि. १ ऑगस्ट रोजी अत्यंत दिमाखदार वातावरणात उद्‌घाटन होत आहे. राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, उद्‌घाटनाच्या एक दिवस आधी एक्झिबिशनची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

जनता बझार चौक, राजारामपुरी येथे उभारण्यात आलेली आकर्षक कमान सध्या परिसरातून जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वच नागरिकांचे आणि प्रवाशांचे खास लक्ष वेधून घेत आहे. ‘गगन टूर्स’ प्रस्तुत ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन्स २०२६’ पॉवर्ड बाय अ हेवन हॉलिडेज या तीन दिवसीय (१, २ आणि ३ ऑगस्ट) प्रदर्शनात एकाच छताखाली देश-विदेशातील सहलींची पर्वणी उपलब्ध होणार आहे. काश्मीर, हिमाचल, केरळ यांसारख्या देशांतर्गत पर्यटनस्थळांसह युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पट्टाया अशा आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्सची माहिती आणि ‘ऑन द स्पॉट’ बुकिंगवर मिळणाऱ्या विशेष सवलती हे या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

शनिवार दि.१ पासून सलग तीन दिवस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश आणि मोफत पार्किंग सुविधेसह खुले राहील. पर्यटनाचे अचूक नियोजन करण्यासाठी कोल्हापूरकर व परिसरातील पर्यटनप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन ‘पुढारी’, ‘पुढारी ऑनलाईन’ व ‘टोमॅटो एफएम’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८१४९५८२४४२.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news