पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशनचा आज शुभारंभ

नवनवीन ट्रेंडस्, टूर डेस्टिनेशन्स; आकर्षक ऑफर्सचा खजिना तीन दिवस खुला
Pudhari Tours and Travels Exhibition
पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशनचा आज शुभारंभ. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरातील हौशी पर्यटकांसाठी आणि एकूणच पर्यटन व्यवसायाला दिशादर्शक ठरणार्‍या ‘दैनिक पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन’चे उद्घाटन शनिवार, दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी येथे सकाळी होणारआहे. या एक्झिबिशनमध्ये पर्यटनविषयक माहितीचा खजिनाच तीन दिवस खुला राहणार आहे.

Pudhari Tours and Travels Exhibition
‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन

या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते होणार असून, सफर टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रा. लि.चे संचालक रवी शर्मा आणि जनरल मॅनेजर नम्रता घोरपडे यांची या कायर्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. देश-विदेश पर्यटन उद्योगातील नवनवे ट्रेंडस्, पर्यटनस्थळांचे विविध पर्याय, आकर्षक टूर पॅकेजेस, अर्ली बुकिंग ऑफर्स, वीकेंड पिकनिक स्पॉटस्, इमर्जिंग टूर डेस्टिनेशन्स यासह पर्यटनविषयक माहितीचा खजिना या एक्झिबिशनमध्ये एकाच छताखाली खुला होणार आहे. तुमच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी आणि तुमच्या बजेटमध्ये बसेल असे टूर्सचे पर्याय निश्चित करण्यासाठीची हे एक्झिबिशन म्हणजे एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

Pudhari Tours and Travels Exhibition
कोल्हापूर : ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू

शनिवार, दि. 10 ते सोमवार, दि. 12 दरम्यान कोल्हापुरात व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे होणार्‍या एक्झिबिशनचे सफर टूर्स अँड ट्रॅव्हल्स मुख्य प्रायोजक आहेत. कोरोना महामारीनंतर जगभरात पर्यटनाचा ट्रेंड वाढत आहे. भारतातूनदेखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक परदेशवारी करत आहेत. अलीकडे मध्यमवर्गातदेखील परदेश पर्यटनाची क्रेझ वाढत आहे. पर्यटनाला जायचे म्हणजे डेस्टिनेशन आणि प्लॅनिंग आलेच. असेच प्लॅनिंग करण्यासाठी हे एक्झिबिशन एक उत्तम संधी आहे. पर्यटन व्यवसाय वृद्धीसाठीचे अनेक कार्यक्रम या एक्झिबिशनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. पुढील सुट्टीचे नियोजन करण्यासाठी उत्सुकता असलेल्यांची नवनवीन ठिकाणांची जिज्ञासा पूर्ण करणारे हे प्रदर्शन असेल. पर्यटन क्षेत्रातील विविध प्रकारचा व्यवसाय करणार्‍या लोकांसाठी हे प्रदर्शन व्यवसाय वृद्धीचे एक प्रवेशद्वारच ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8805021253

Pudhari Tours and Travels Exhibition
दै. पुढारी ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news