

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफएम 94.3 आयोजित ‘दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2025’चा भव्य बंपर ड्रॉ ‘पुढारी कार्निव्हल’मध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते काढण्यात आला. या ड्रॉमध्ये वारणा कोडोली येथील संग्रामसिंह आनंदराव घाटगे यांनी प्रथम क्रमांकाचे ई-बाईक बक्षीस पटकावले असून, त्यांना आकर्षक इलेक्ट्रिक बाईक मिळाली आहे. त्यांनी या महोत्सवांतर्गत ‘तनिष्क’ शोरूममधून दागिने खरेदी केले होते.
दुसर्या क्रमांकाचे अर्धा तोळे सोन्याचे बक्षीस गडमुडशिंगी येथील राजू पाटील यांनी जिंकले आहे. त्यांनी ‘व्यंकटेश्वरा गारमेंट’मधून खरेदी केली होती. यावेळी एस. एस. कम्युनिकेशनचे तरुण नागर, चेतन दोशी, तनिष्कचे प्रसाद कामत, जय कामत, महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल, गोपीनाथ अनंत चिपडे सराफ यांच्या वतीने मुरलीधर चिपडे, सिद्धांत चिपडे आणि बालाजी कलेक्शनचे प्रशांत पोकळे उपस्थित होते.
याशिवाय पुढारी कार्निव्हलच्या प्रायोजकांमध्ये ऑक्सिरिचचे रमेश लालवानी, सागर लालवाणी, वारणा दूध संघाचे सह-व्यवस्थापक (मार्केटिंग) प्रमोद डोणकर, रॉनिक स्मार्टचे तानाजी पवार, लकी फर्निचरच्या मनाली गायकवाड आणि सोसायटी टीचे असिस्टंट ब—ँड मॅनेजर क्षितीज तांडेल, दैनिक ‘पुढारी’च्या वतीने कार्यकारी संपादक विजय जाधव, सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, बाळासाहेब नागरगोजे, मयूर तांबेकर, राहुल शिंगणापूरकर, जावेद शेख, रिया भांदिगरे यांच्यासह जाहिरात विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूरच्या आर्थिक उलाढालीला चालना देण्यासाठी आणि ग्राहकांना खरेदीचा अधिक आनंद देण्यासाठी ‘पुढारी’तर्फे दरवर्षी या शॉपिंग उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही ग्राहकांनी याला उदंड प्रतिसाद दिला. तिसर्या क्रमांकापासूनच्या अन्य बक्षीस विजेत्यांची नावे दैनिक ‘पुढारी’त लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
...अन् सुखद धक्का बसला!
कोल्हापूरच्या तनिष्क शोरूममध्ये खरेदीसाठी गेलो असताना ‘पुढारी शॉपिंग उत्सव 2025’ चे कूपन भरले होते; पण कामाच्या व्यापात मी ते विसरूनच गेलो होतो. मी फार्मा कंपनीत नोकरीला असल्याने सध्या बंगळूरमध्ये आहे. आज सकाळी अचानक‘पुढारी’मधील बातमी पाहायला मिळाली आणि माझे नाव पहिल्या क्रमांकाच्या इलेक्ट्रिक बाईक या बक्षिसासाठी लकी ड्रॉमधून निवडले गेल्याचे समजले. हा माझ्यासाठी खूप मोठा सुखद धक्का होता. अनेक वर्षांपासून मी ‘पुढारी’च्या उपक्रमांत सहभागी होत आहे. या योजनेबद्दल ‘पुढारी’ आणि ‘तनिष्क’चे मनःपूर्वक आभार!
- संग्रामसिंह घाटगे, वारणा कोडोली