Pudhari’-Thomas Cook Grand Travel Gatherings| ‘पुढारी’-थॉमस कूक ‘ग्रँड ट्रॅव्हल मेळाव्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

हॉटेल पर्ल येथे पर्यटकांची गर्दी; अनेकांनी केले स्पॉट बुकिंग
Pudhari’-Thomas Cook Grand Travel Gatherings
कोल्हापूर ः दै. ‘पुढारी’ आणि थॉमस कूक यांच्या वतीने रविवारी हॉटेल पर्ल येथे आयोजित ‘ग्रँड ट्रॅव्हल मेळाव्या’त पर्यटकांनी विविध देश-विदेशांतील सहलींची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती. (छाया ः पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आपले परदेशवारीचे स्वप्न साकार करण्यासाठी कोल्हापूरकरांनी रविवारी ‘थॉमस कूक’ आणि दै. ‘पुढारी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रँड ट्रॅव्हल मेळाव्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाहूपुरी येथील हॉटेल पर्ल येथे आयोजित मेळाव्यात सकाळपासूनच पर्यटकांनी विविध देश-विदेशांतील सहलींची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती.

मेळाव्याचे उद्घाटन थॉमस कूकचे रिजनल हेड श्रेयस खापरे, दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, सिनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर आणि थॉमस कूकचे श्रीधर देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना मान्यवरांनी बदलत्या पर्यटन संस्कृतीची माहिती देत थॉमस कूकच्या विविध टूर्सची आणि थॉमस कूकच्या प्रदीर्घ वाटचालीवर प्रकाश टाकला. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ‘स्पेशल मराठी युरोप टूर’. या टूर्सच्या ग्राहकांसाठी लोकप्रिय अभिनेते सुबोध भावेंसोबत 30 मे 2026 रोजी खास ‘गप्पा गोष्टी सुबोधसोबत’ या कार्यक्रमाचे आयोजन स्वित्झर्लंड येथे करण्यात आलेले आहे. त्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

मेळाव्यात बुकिंगवर भरघोस सवलती देण्यात आल्या. यामध्ये 35,000 रुपयांची थेट सूट, युरोप बुकिंगवर ‘क्रूझ हॉलिडे’ मोफत आणि ‘बाय 1 गेट 1 फ्री’ यासारख्या योजनांनी पर्यटकांना आकर्षित केले. युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांसारख्या आंतरराष्ट्रीय सहलींपासून ते कैलास मानसरोवर, चारधाम यांसारख्या आध्यात्मिक यात्रांपर्यंत सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध होती. तसेच दुबई, थायलंड, व्हिएतनाम यांसारख्या ‘सुलभ व्हिसा’ असलेल्या देशांसाठीही पर्यटकांनी मोठी उत्सुकता दाखवली. ट्रॅव्हशुअर सुविधेमुळे सुरक्षेची खात्री असल्याने अनेकांनी स्पॉट बुकिंग केले.

मेळाव्याच्या ठिकाणी कुटुंबांसाठी विविध मजेदार खेळ आणि बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातही ग्राहकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. खास लोकाग्रहास्तव या मेळाव्यातील सवलती आणि ऑफर्स फक्त ‘पुढारी’च्या वाचकांसाठी अजून 7 दिवसांनी वाढवण्यात आल्या आहेत. ज्या ग्राहकांना मेळाव्यात येण्यास जमले नसेल, त्यांनी थॉमस कूकच्या जी/06, सेंटर वन प्लाझा, सासने ग्राऊंडसमोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news