कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी गेल्या 50 वर्षांपासून लढा सुरू होता. याला दै. ‘पुढारी’ने बळ दिले. त्यामुळे हा लढा यशस्वी झाल्याच्या भावना हॉटेल मालक संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. डॉ. प्रतापसिंह जाधव यांची ‘पुढारी’ कार्यालयात भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ही मागणी न्याय्य आणि व्यवहार्य आहे. ती पटवून देण्यात आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानेच हे यश मिळाले आहे. त्याचे श्रेय डॉ. जाधव यांनाच जाते, असेही यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानबाग यांच्या हस्ते डॉ. जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपाध्यक्ष अरुण भोसले-चोपदार, सचिव सिद्धार्थ लाटकर, माजी अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, प्रसाद कामत, जयवंत पुरेकर, उमेश राऊत, शिवराज जगदाळे, जय कामत, करण जगदाळे, शंकरराव यमगेकर, मोहन पाटील, सुशांत पै. मनीष सूर्यवंशी आदी उपस्थित होते.