'पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल' दुसरा लकी ड्रॉ उत्साहात

सुमेधा गुळवणी आणि अर्जुन पटेल ठरले अर्धा तोळा सोन्याचे भाग्यवान विजेते
Pudhari Shopping Festival
कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफएम दसरा दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हलचा दुसरा लकी ड्रॉ एसएस कम्युनिकेशनमध्ये पार पडला. यावेळी डावीकडून रुद्र चिपडे, यश चव्हाण, कुशल ओसवाल, शशिकांत पोवार, प्रशांत पोकळे, नितीन पाटील, कुणाल लडगे, जावेद शेख, रिया भांदिगरे, बाळासाहेब नागरगोजे. (छाया ः पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात खरेदीसोबत ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देणार्‍या दै. ‘पुढारी’ आणि 94.3 टोमॅटो एफएम आयोजित ‘शॉपिंग उत्सव 2024’चा दुसरा लकी ड्रॉ एसएस कम्युनिकेशन, बसंत-बहार रोड, कोल्हापूर येथे पार पडला. या ड्रॉमध्ये अर्धा तोळा सोन्याचे पहिले बक्षीस हरिओमनगर येथील सुमेधा गुळवणी (कूपन क्र. 017712) आणि पेठवडगावचे अर्जुन पटेल (कूपन क्र. 034239) यांनी जिंकले.

गुरुवार, दि. 28 रोजी या महोत्सवात सहभागी दुकानांच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा लकी ड्रॉ काढण्यात आला. प्रथम क्रमांकाच्या बक्षीस विजेत्या सुमेधा गुळवणी यांनी भारत डेअरी मंगळवार पेठ येथून, तर प्रथम क्रमांकाचे आणखी एक विजेते अर्जुन पटेल यांनी राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्समधून खरेदी केली होती. एसएस कम्युनिकेशनचे एचआर हेड नितीन पाटील, बालाजी कलेक्शनचे प्रशांत पोकळे, वरद डेव्हलपर्सचे यश चव्हाण, महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरीचे कुशल ओसवाल, नागाळा पार्क येथील चिपडे सराफचे रुद्र चिपडे आणि अनघा ज्वेल्सचे कुणाल लडगे यांच्या हस्ते हा ड्रॉ काढण्यात आला.

‘पुढारी’चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, जाहिरात व्यवस्थापक (शहर) बाळासाहेब नागरगोजे, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) जावेद शेख, सीनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर आणि सहायक जाहिरात व्यवस्थापक रिया भांदिगरे, जाहिरात प्रतिनिधी आणि ग्राहक उपस्थित होते. तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकांची बक्षीस विजेत्यांची नावेही लकी ड्रॉद्वारे काढण्यात आली.

द्वितीय क्रमांकाचे बक्षीस (1 ग्रॅम सोने) विजेते असे :

1)शहाजी पाटील (कूपन क्र. 27602) 2) संतोष खोत (कूपन क्र. 11326) 3) मधुरा नाईकवडी (कूपन क्र. 11653), 4) अथर्व पाटील (कूपन क्र. 48743), 5) मुन्ना महातो (कूपन क्र. 5219). या पुढील बक्षीस विजेत्यांची नावे व बक्षीस वितरणाबद्दलची माहिती दै. ‘पुढारी’त पुढील काळात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मी राष्ट्रीयीकृत बँकेच्या सेवेत असून, सहजच म्हणून कूपन भरून दिले होते. मला प्रथम क्रमांकाचे अर्ध्या तोळ्याचे बक्षीस लागले आहे, हा माझ्यासाठी अनपेक्षित आणि सुखद धक्का आहे. ‘पुढारी’चे खूप खूप धन्यवाद..
सुमेधा गुळवणी, हरिओमनगर, कोल्हापूर
मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस लागले आहे, ही बातमीच माझ्यासाठी अविश्वसनीय अशी आहे. मी राजारामपुरीत महेंद्र ज्वेलर्समध्ये खरेदी केली आणि विसरून गेलो होतो. माझे पेठवडगाव येथे हार्डवेअरचे दुकान आहे.
अर्जुन पटेल, पेठवडगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news