कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’ आयोजित आणि ‘इन्व्हेड ॲग्रो लि.’ प्रायोजित ‘दसरा दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी तुफान गर्दी केली. रविवारी (दि. ११) सुट्टीनिमित्त प्रदर्शनात विक्रमी गर्दीची शक्यता आहे. एकाच छताखाली विविध उत्पादनांवर ऑफर्सचा अक्षरशः पाऊस पडत असून खरेदीसाठी ग्राहक सहकुटुंब गर्दी करत आहेत.
प्रदर्शनात विविध गृहोपयोगी आणि खाद्यवस्तूंची रेलचेल असून आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. वाघ बकरी चहावर प्रति किलो १०० रुपये सूट व १ किलो साखर मोफत आहे. चहावर चहाचे भांडे फ्री सवलत आहे. गिरनार चहावर ६० रुपये सूट व दोन कंटेनर फ्री, तर विक्रम चहावर २० रुपये सवलत व लकी ड्रॉद्वारे पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
स्वयंपाकघर व उपकरणे : तृप्ती ग्राइंडर्सवर १,२०० रुपयांची सूट, रोनिक वॉटर हिटरवर १,००० सूट आणि इन्स्टॉलेशन फ्री, युुरेका फोर्ब्सवर ४,००० पर्यंत बायबॅक सूट, आनंद एजन्सीजकडे सोलर बॅग फ्री आणि प्रायोजक इन्व्हेड ॲग्रोतर्फे शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी व कृषी सल्ला उपलब्ध आहे.
चितळे बंधू मिठाईवाले यांच्या विविध दिवाळी पॅक्सवर १० ते ३० टक्केपर्यंत डिस्काऊंट मिळत असून यात धारवाड पेढा, नमकीन बार, मलाई म्हैसूर पाक आणि चीज बाकरवडी विशेष उपलब्ध आहेत. मॅकिनोज या अहमदाबाद बेस्ड कंपनीतर्फे पीनटस्, नाचोज आणि कॉर्न उत्पादनांवर मोठी सवलत मिळत आहे. बाबा जाधव मसाले (पुणे) यांच्या स्टॉलवर हाडांसाठी उत्तम असलेले शेवगा सूप, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि सोलकढी पॅकेटस्वर मोठा डिस्काऊंट आहे. इन्स्टंट गोबी मंचुरियनच्या स्टॉलवर पॅकेट १५० रुपयांऐवजी १०० रुपयांना, तर ३ पॅकेटस् फक्त २५० रुपयांना मिळत आहेत. याशिवाय लोणची, पापड, मिल्कशेक, मुखवासच्या स्टॉल्सवरही ग्राहक गर्दी करत आहेत.
आरोग्य हस्तकला व वस्त्रोद्योग : निशा हर्बलच्या स्टॉलवर त्वचा आणि केसांच्यासाठी विविध उत्पादनांवर १० ते १५ टक्के घसघशीत सवलत दिली जात आहे. यामध्ये चेहऱ्याच्या ग्लोसाठी फेशियल किट, त्वचा मुलायम ठेवणारे मॉयश्चरायझर, स्मार्ट ग्लो शॅम्पू आणि सांधेदुखीसाठी गुणकारी जॉईंट पेन ऑईलचा समावेश आहे. ग्लॅम्प आयडिया अँड स्टुडिओजचे २४ कॅरेट सोन्याचा वर्ख असलेले काचेचे गणपती आणि इतर वस्तू आहेत. काचेच्या दिव्यांवर बल्क खरेदीत २० टक्के पर्यंत सूट, लॅबोरेटरी ग्लासमध्ये तयार केलेली पूजा थाळी देखील उपलब्ध आहेत. याशिवाय काश्मिरी साड्या, ड्रेस मटेरियल, पिलो कव्हर्स आणि होलसेल अगरबत्ती यांच्या स्टॉल्सवर वैविध्यपूर्ण वस्तूंची रेलचेल आहे.
ॲक्सेसरीज, इन्शुरन्ससह भरघोस सवलती
कोल्हापूर : ऑटोमोबाईल विभागात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली असून, दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी नामांकित ब्रँडस्नी स्पॉट बुकिंगवर भरघोस ऑफर्स दिल्या आहेत. टू व्हीलर, फोर व्हीलर आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या स्टॉलवर सुरू असलेल्या या ऑफरमुळे वाहनप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
दुचाकी सेगमेंटमध्ये ‘रेवहेड यामाहा’कडून कोणत्याही गाडीच्या बुकिंगवर थेट ५,९९९ रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स पूर्णपणे फ्री दिला जात आहे. तसेच गाडीचे डाऊन पेमेंट फक्त ३,९०० रुपयांपासून सुरू होत असून प्रत्येक बुकिंगवर ग्राहकाला एक स्मार्टवॉच अगदी मोफत मिळत आहे. ‘केआर टीव्हीएस’च्या सर्व पेट्रोल स्कूटरच्या खरेदीवर सर्व ॲक्सेसरीज पूर्णपणे फ्री देण्यात येत असून, अवघ्या ३,००० रुपयांच्या बुकिंग अमाऊंटवर ऑन द स्पॉट बुकिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय ‘सीकेपीएच मोटर्स’कडे नुकतीच लाँच झालेली व्हेस्पा (Vespa) ची स्टायलिश आणि पॉवरफुल SXR 175 स्कूटर प्रदर्शनात थेट पाहण्यासाठी आणि बुकिंगसाठी उपलब्ध आहे.
कार आणि इलेक्ट्रिक वाहन प्रेमींसाठीही बंपर सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘केआर मोटर्स (मारुती सुझुकी अरेना)’कडून विविध लोकप्रिय कार मॉडेलवर तब्बल १ लाख ७० हजार रुपयांपर्यंतची घसघशीत सवलत दिली जात आहे. ‘उन्नती मोटर्स’कडे महिंद्राच्या बहुचर्चित आणि नवीन थार आरओक्स आणि एक्सयुव्ही गाड्यांच्या आगमनाने ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, याशिवाय महिंद्राचे इव्ही मॉडेल्स उपलब्ध आहेत. ‘ट्रायस्टार व्हील्स’च्या सिट्रॉन सी ३ (१२०० सीसी सेगमेंट), सी ३ एअर क्रॉस आणि बसाल्ट या गाड्यांच्या स्पॉट बुकिंगवर आकर्षक डिस्काऊंट उपलब्ध आहे. ‘कोंडुसकर किया’च्या स्टॉलवर लोकप्रिय कारेन्स, कंपनी फिटेड सीएनजी गाड्या आणि ४९० किमी रेंज असलेली पॉवरफुल इलेक्ट्रिक गाडी EV-Clavis हे ग्राहकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. तसेच ‘बिगॉस इलेक्ट्रिक’च्या तब्बल सहा ते सात व्हेरियंटस्वर आणि स्पॉट बुकिंगवर थेट १०,००० रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जात आहे.