

वारणानगर : दै. ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफएम द्वारा आयोजित ‘शॉपिंग उत्सव 2024’ चा ग्रामीण विभागासाठीचा तिसरा लकी ड्रॉ सोमवारी, (दि. 13) रोजी वारणानगर येथील वारणा बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडला. पेठ वडगावचे अभिषेक मोहन पाटील आणि विनायक विरुपाक्ष शेट्ये-पाटील हे या ड्रॉमधील पहिला क्रमांकाच्या अर्धा तोळे सोन्याच्या बक्षिसाचे भाग्यवान विजेते ठरले.
अभिषेक पाटील पुण्यात आयटी कंपनीत काम करतात. त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने गावी आले असता वारणा बँकेत कामानिमित्त गेले असता पुढारी शॉपिंग उत्सव 2024 च्या लकी ड्रॉचे कुपन भरले होते. विनायक शेट्ये पाटील, हे कोल्हापुरातील एका खासगी कंपनीत काम करतात, त्यांनी वारणा बँकेत कर्ज घेत असताना कुपन घेतले होते. प्रमुख पाहुणे म्हणून वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे उपस्थित होते. दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, वारणा बँकेचे व्हा. चेअरमन उत्तम पाटील, ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, प्रताप पाटील, व्यवस्थापक पी. टी. पाटील, डॉ. प्रशांत जमने, दैनिक ‘पुढारी’चे जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) जावेद शेख, राजू तिवले, प्रकाश मोहरेकर आदी उपस्थित होते. उत्सवात सहभागी ग्राहकांना सोनं, स्मार्टफोन आणि इतर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली होती. 3 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान या शॉपिंग उत्सवात सहभागी दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांतून खरेदी केलेल्या किंवा सेवा घेतलेल्या ग्राहकांना या लकी ड्रॉची कुपन्स देण्यात आले होते. हे कुपन भरून ग्राहकांनी संबंधित व्यावसायिक आस्थापनांमध्ये जमा केले होते. त्यातून हा लकी ड्रॉ काढण्यात आला.
बँकेच्या वतीने समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांचा निपुण कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) जावेद शेख यांनी स्वागत केले. दै. ‘पुढारी’च्या वतीने अनिल पाटील यांनी निपुण कोरे तसेच इतर उपस्थितांचा सत्कार केला. लकी ड्रॉमधील अन्य बक्षीस विजेत्यांची नावे दै. ‘पुढारी’त लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.