

कोल्हापूर : दसरा व दिवाळी हे सण म्हणजे आनंदाची पर्वणीच. खरेदीमुळे या सणांचा आनंद द्विगुणित होतो. या सणांमध्ये नवीन कपड्यांपासून ते सजावटीच्या वस्तूंपर्यंत, वाहन खरेदीपासून ते अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत सर्व प्रकारच्या खरेदीची लगबग असते. याच खरेदीचा आनंद वाढवण्यासाठी ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2024’ या प्रदर्शनाची 4 ऑक्टोबरपासून धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे. या प्रदर्शनासाठी श्राईन इसुझू हे ऑटोमोबाईल पार्टनर, तर सहप्रायोजक म्हणून रॉनिक स्मार्ट लाभले आहेत.
हा फेस्टिव्हल खरेदीचे विविध पर्याय आणि आकर्षक ऑफर्स घेऊन येत आहे. हा उत्सव म्हणजे कोल्हापूरकरांसाठी खरेदी पर्व ठरणार आहे. हा फेस्टिव्हल 4 ऑक्टोबरपासून राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे सुरू होईल आणि 8 ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुला असेल.
फेस्टिव्हलमध्ये गारमेंटस् आणि गृहोपयोगी वस्तूंच्या भव्य दालनासह आटाचक्की, किचन ट्रॉली, सौंदर्यप्रसाधने, टीव्ही, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी खास स्टॉल्स असतील. यासोबतच चहा, मसाले, प्लास्टिकच्या गृहोपयोगी वस्तू, बूट, ज्वेलरी, बेकरी उत्पादने, साड्या, फॅन्सी ड्रेस, सजावटीच्या वस्तू, हेल्थ केअर, पर्सनल केअर आणि होम केअरच्या वस्तूंचे शंभराहून अधिक स्टॉल्सदेखील प्रदर्शनात असतील.
याशिवाय आपली स्वप्नातील कार किंवा बाईक बूक करण्यासाठी स्वतंत्र ऑटोमोबाईल विभाग आहे. यामध्ये नामांकित कंपन्यांच्या चारचाकी, दुचाकी आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश आहे. या सर्वांवर विशेष ऑफर्स आणि डिस्काऊंट देण्यात येणार असून, स्पॉट बुकिंगवर अधिक आकर्षक सवलतीचा लाभ घेता येईल.
या फेस्टिव्हलमध्ये अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने, विविध व्हरायटी आणि भरघोस डिस्काऊंटची संधी खरेदीदारांसाठी उपलब्ध आहे.
स्टॉल बुकिंगसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : 9834433274.