

कोल्हापूर : लोकशाहीचा आधारस्तंभ आणि ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या सरपंचांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दैनिक ‘पुढारी’च्या वतीने आयोजित ‘सरपंच सन्मान सोहळा’ शनिवार (दि. 2) रोजी होणार आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या या दिमाखदार सोहळ्यात गावगाड्याचे नेतृत्व करणार्या सरपंचांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याला सलाम केला जाणार आहे.
या गौरव सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांच्या सन्मानासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हॉटेल विकस्सर द फर्न येथे सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहून सरपंचांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
झटणार्या, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणार्या आणि गावाच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणार्या सरपंचांच्या कामाची दखल घेऊन दैनिक ‘पुढारी’ने हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात उपस्थित सरपंचांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.