

कोल्हापूर : कोल्हापुरातील घर खरेदीदारांसाठी बहुप्रतीक्षित ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ शनिवार (दि. 8) पासून सुरू होत आहे. दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत आणि सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सहप्रस्तुत या एक्स्पोमध्ये कोल्हापुरातील नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे अनेक गृह प्रकल्पातील हजारो घरांचे पर्याय एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र क्रेडाईचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सीईओ आणि एमडी दीपक कल्याणजी चंदे, सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक सचिन मांगले, गायकवाड इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक पृथ्वीराज गायकवाड आणि अविष्कार इन्फ्राचे संचालक अविनाश जाधव आदी उपस्थित राहणार?आहेत. आर. व्ही. ओपन ग्राऊंड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क, बावडा रोड येथे 8, 9 आणि 10 मार्च या कालावधीत हा एक्स्पो होणार आहे. या प्रदर्शनाचे गायकवाड इन्फ—ास्ट्रक्चर आणि अविष्कार इन्फ्रा हे सहयोगी प्रायोजक आहेत.
प्रदर्शनात बजेट आणि लक्झरी घरांचे असंख्य पर्याय उपलब्ध असून फ्लॅटस्, रो हाऊसेस, बंगलो, पेंटहाऊस आणि प्लॉटस् यांसाठी थेट बुकिंगची संधी आहे. आधुनिक गृहप्रकल्प, गृहबांधणीतील नवीन ट्रेंडस् आणि परवडणार्या किमतीत घर खरेदीसाठी खास ऑफर्सही येथे मिळणार आहेत. तसेच बांधकाम क्षेत्रात गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनात ग्राहकांना विशेष सवलती आणि फायनान्स योजनांचा लाभ घेता येणार आहे. विविध वित्तीय संस्था आणि बँकाचे स्टॉल देखील प्रदर्शनात आहेत. कोल्हापुरातील वेगाने विकसित होणार्या परिसरात गुंतवणुकीच्या संधी शोधणार्या खरेदीदारांसाठी हा एक्स्पो उपयुक्त ठरणार आहे. स्पॉट बुकींगवर मुद्रांक शुल्कात सवलत, इएमआयच्या व्याजात सवलत, विविध प्रकारच्या भेटवस्तू अशा खास ऑफर्स एक्स्पोमध्ये घर बुक केल्यास मिळणार आहेत. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणार्या या प्रदर्शनाला उपस्थित राहून आपल्या घराचा शोध प्रदर्शनात पूर्ण करा.
प्रदर्शनाचे ठिकाण : आर. व्ही. ओपन ग्राऊंड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क, बावडा रोड, दिनांक : 8, 9 आणि 10 मार्च
वेळ ः सकाळी 10 ते रात्री 8ः00
अधिक माहितीसाठी संपर्क :
बाळासाहेब : 9850556009
आनंद : 9850991186