Pudhari Property Expo 2026 | ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ ठरणार रिअल इस्टेट गुंतवणूकीचा टर्निंग पॉइंट

कोल्हापूर रिअल इस्टेट ऐतिहासिक ‘टेकऑफ’च्या उंबरठ्यावर; प्रॉपर्टी एक्स्पोत असंख्य पर्याय आणि आकर्षक ऑफर्स
Pudhari Property Expo 2026 |
Pudhari Property Expo 2026 |
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले कोल्हापूर शहर आता पायाभूत सुविधांच्या गतिमान विकासाच्या बळावर पश्चिम महाराष्ट्रातील रिअल इस्टेटचा सर्वात मोठा ‘ब्राइट स्पॉट’ म्हणून वेगाने पुढे येत आहे. हायकोर्ट सर्किट बेंच, १,१०० खाटांचे अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय, भव्य कन्व्हेन्शन सेंटर आणि जोतिबा, नृसिंहवाडी, खिद्रापूर यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक पर्यटन केंद्रांचा कायापालट यामुळे शहराची वाटचाल अभूतपूर्व आर्थिक व नागरी ‘टेकऑफ’च्या दिशेने सुरू झाली आहे.

या सुवर्णकाळाच्या पार्श्वभूमीवर येत्या १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान कोल्हापुरात रंगणाऱ्या तीनदिवसीय ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. असेंब्ली रोडवरील हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे. ‘रामिसना ग्रुप’ हे या प्रदर्शानाचे मुख्य प्रायोजक असून, या प्रदर्शनात सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या १ व २ बीएचके घरांपासून ते उच्चभ्रू जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लक्झरी ३ व ४ बीएचके फ्लॅट्स, स्वतंत्र रो-हाऊस, प्रीमियम व्हिला, उपनगरांतील एनए प्लॉट्स आणि मोक्याच्या ठिकाणच्या व्यावसायिक गाळ्यांचे शेकडो पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे विधिज्ञ, व्यावसायिक तसेच लगतच्या सहा जिल्ह्यांतून हजारो लोक शहरात येत आहेत. अनेकजण कामानिमित्त कायमचे स्थलांतरित झाले आहेत. परिणामी निवासी घरांना आणि भाडेतत्त्वावरील जागांना चांगली मागणी आहे. सध्या कोल्हापुरात १.५ ते ४ टक्क्यांपर्यंत खात्रीशीर रेंटल यील्ड मिळत असून, मालमत्तांचे दर वार्षिक १२ ते १५ टक्क्यांच्या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सुरक्षित भविष्यासाठी आणि वाढत्या भांडवली परताव्यासाठी स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ मानली जात आहे.

दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर नामांकित बँकांचे सुलभ गृहकर्ज, कमी व्याजदर आणि बांधकाम व्यावसायिकांकडून दिल्या जाणाऱ्या सणासुदीच्या फेस्टिव्हल ऑफर्स व थेट स्पॉट बुकिंग डिस्काउंट्स हे या एक्स्पोचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रिअल इस्टेटमधील या संधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हायकोर्ट सर्किट बेंच, १,१०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय, प्रस्तावित कन्व्हेन्शन सेंटर आणि धार्मिक पर्यटनामुळे कोल्हापूरच्या रिअल इस्टेटमध्ये सकारात्मक वातावरण आहे. सहा जिल्ह्यांतून न्यायालयीन कामकाजासाठी होणारे स्थलांतर, यामुळे भाड्याच्या घरांची वाढती मागणी, १२ ते १५ टक्के वाढता परतावा यामुळे परवडणाऱ्या घरांपासून लक्झरी ४ बीएचकेपर्यंत मागणी वाढली आहे. घर खरेदी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे. पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी असणार आहे.

सचिन ओसवाल, रामसिना ग्रुप, मुख्य प्रायोजक

कोल्हापुरात नियोजित आयटी पार्क, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि सर्किट बेंचचे कायमस्वरूपी खंडपीठात झालेले रूपांतर यामुळे शहराला एक वेगळे व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या मोठ्या प्रकल्पांमुळे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला प्रचंड वाव निर्माण झाला असून, शहरात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे सध्याच्या काळात अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. दसरा-दिवाळीच्या या मुहूर्तावर घर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी ग्राहकांनी ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चा नक्की लाभ घ्यावा.
नंदकिशोर पाटील, अनंत इस्टेट डेव्हलपर्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news